Posts

Showing posts from March, 2025

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे धडाकेबाज कामगिरी!

Image
  पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी.                 देशी बनावटीची पिस्टल सह आरोपीस केले जेरबंद. श्री अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग , पंढरपूर व सहा पोलीस अधीक्षक अंजना कृष्ण व्ही एस मॅडम सो यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २६/०३/२०२५रोजी २१:००चे सुमारास गुन्हे प्रगटीकरण पथकासह  पो.ठाणे हद्दीतील गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असता गुप्त बातमीदाराकरवी माहिती प्राप्त झाली की, पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील जुना अकलूज रोड, पुणे हायवेच्या ब्रिज खाली एक इसम  त्याचे जवळ देशी बनावटीचे रिव्हालवर बाळगून फिरत आहे. सदर बातमी बाबत सहा पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा मॅडम यांनी आम्हा गुन्हे प्रकटीकरण शाखेत हकीकत सांगून सदर प्राप्त माहितीची खातरजमा करून कारवाई करणे,कामी पथक तात्काळ रवाना केली सदर ठिकाणी सापळा रचून संशयित इसम नामे अरविंद भीमराव अटकळे-३२ वय वर्ष राहणार कौठाळी ता,पंढरपूर जि. सोलापूर या ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेस एक देशी बनावटीचे पिस्टल मॅक्झिनसह मिळून आल...

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग व रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले !

Image
  पंढरपूर प्रतिनिधी   माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग व रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले . यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह पंढरपूर मंगळवेढा युवा नेते प्रणव परिचारक , आमदार अभिजीत पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार बाबासाहेब देशमुख , सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते.   यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.  व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखडा अंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व त्यांना मार्गदर्शन केले . लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌                      मोहसीन इसाक खान.     ...

माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून परिचारक कुटुंबीयांचे सांत्वन भेट !

Image
  पंढरपूर  ( प्रतिनिधी )   माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून परिचारक कुटुंबियांची सांत्वन पर भेट  !   सोलापूर विधान परिषद माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील श्री प्रभाकर परिचारक यांचे मागील दोन महिन्यापूर्वी वृद्धपकाळाने निधन झालेले होते.आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी त्यांची व कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.        यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार कल्याणशेट्टी, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक आदी उपस्थित होते. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌                      मोहसीन इसाक खान.                         (८६०५१७१९१७).                    रोहन हनुमंत हिवर...

जमिनीच्या वादातून ठार मारल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा !

Image
  सांगोला ( प्रतिनिधी ) उदनवाडी तालुका सांगोला जमीनीच्या वादातून गोळीबार करून एकाच ठार मारल्या प्रकरणी आरोपी बिरू पांढरे यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.       तसेच ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे  पंढरपूर येथील जिल्हा न्यायाधीश डी एन सुरवसे यांनी हा निकाल दिला आहे.उदनवाडी तालुका सांगोला येथील गट क्रमांक ६८ मध्ये १९जुलै२०२४ रोजी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. फिर्यादी दत्तात्रय पांढरे यांनी खरेदी केलेल्या जमिनीवर आरोपी बिरू पांढरे व इतरांनी जमाव जमवून हल्ला केला .आरोपी बिरू पांढरे जो भारतीय लष्करात नोकरीस होता त्याने स्वतःकडील बंदुकीतून गोळीबार करून उज्वला पांढरे हिला ठार मारले ,तसेच इतर आरोपींनी फिर्याद व साक्षीदारांना लोखंडी पाईप व दगडफेकीने जखमी केली या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात १९ जुलै २०२४ रोजी भादंवि.कलम ३०२:३०७:१४३:१४७:१४८:१४९:आर्म्स अक्ट.‌३:२५ आणि मुंबई पोलीस कायदा कलम १३५: अन्वये.गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अजय कदम यांनी तपास करून आरोपीविरुद्ध पंढरपूर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र केले होते सरकार पक्षातर्फे ...

महसूल प्रशासनाची धडाडीची कारवाई !

Image
पंढरपूर  (प्रतिनिधी ) पंढरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा वाहतूक केली जात असुन याबाबत अनेक वेळा तक्रारी येत असल्याने महसूल प्रशासन सतर्क झाले आणि त्यांनी अचानक कारवाई केली. पंढरपूर उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे व पंढरपूर तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर जवळील चंद्रभागा नदी पात्रामध्ये ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या तीन थरर्माकोल तराफे नष्ट करण्यात आल्या आहेत या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंकज राठोड ,संतोष सुरवसे ,ग्राम महसूल अधिकारी साईनाथ अडगटाळे ,अनिल बागल सरताज मुजावर ,गणेश पिसे ,रविकिरण लोखंडे ,लोकरे व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी हे कारवाई करण्यासाठी सहभागी झाले होते. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌                मोहसीन इसाक खान.                   (८६०५१७१९१७).                रोहन हनुमंत हिवराळे.           ...

समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग निधी वाटप !

Image
  मंगळवेढा  (प्रतिनिधी ) पंढरपूर  मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारापुर तालुका मंगळवेढा ग्रामपंचायतीचा दिव्यांग निधी ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले . हा दिव्यांक निधी मिळावा म्हणून प्रहार चे तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रहार शाखा मारापुरचे संतोष यादव सतत प्रयत्न करीत होते, विनायक यादव हे मारापुर गावाचे लोकनियुक्त सरपंच झाल्यापासून दरवर्षी हा निधी न मागता दिव्यांगासाठी खर्च करत असतात यावेळी सरपंच विनायक यादव यांनी गावातील दिव्यांगाच्या प्रत्येक अडचणीत मी मदत करेन प्रत्येक दिव्यांग बांधवांनी स्वतः च्या व्यवसायाकडे वळाले पाहिजे अडचणीच्या वेळी ग्रामपंचायत व मी स्वतः मदत करेल असे सांगितले सदरच्या दिव्यांग निधी घेण्यासाठी संतोष यादव संजय रणदिवे तानाजी यादव समाधान यादव किरण यादव बालाजी भगरे गणेश आसबे वंदना आसबे .  दिव्यांग बांधव उपस्थित होते यावेळी उपसरपंच अशोक आसबे ग्रामसचिव जमीर मुलाणी ,तानाजी लेंडवे ,खडू कोळी ,अशोक वाघमारे ,गणपत माने ,रामभाऊ बाबर, देविदास म...

जेल रोड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी !

Image
  सोलापूर शहर प्रतिनिधी - सोलापूर शहरात एका चार चाकी वाहनातून बेकायदेशीर विदेशी दारूच्या बाटल्या घोडा जोडबसवण्णा चौक ते जिजामाता दवाखाना मार्गे जाणार असल्याची अवैध वाहतूक जेलरोड पोलिसांनी हाणून पाडला चार चाकी वाहनांसह तीन लाख बारा हजार तिनशेदहा.रुपये.चा मुद्देमाल जप्त केला आहे . यात मिळालेली माहिती अशी की जेलरोड ठाणे कार्यक्षेत्रात रमजान सणानिमित्त पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी तपास किटसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत व सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार गंगावणे,नदाफ खान व पोलीस कॉन्स्टेबल सिनारे असे सर्वजण पेट्रोलिंग करीत होते . गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली ग्रे कलरच्या मारुती सुझुकी व्हॅगनार मध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्या जोडबसवण्णा ते जिजामाता दवाखान्या मार्गे वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा लावून चार चाकी वॅगनारच्या चालकाला जिजामाता दवाखाना ते जेलरोड पोलीस ठाणे दरम्यान असलेल्या नेताजी सुभाष चंद्रबोस बगीच्या जवळ आंबिवली त्याच्याकडे चौकशी केली असता उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याने विश्वासात घे...

पंढरपूर नगर परिषदेची कर वसुली मोहीम !

Image
पंढरपूर प्रतिनिधी - पंढरपूर   नगरपरिषदेची कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतले आहे ,पंढरपूर नगर परिषदेने शहरातील थकीत मालमत्ता धारकांना करांची रक्कम भरणे बाबत वारंवार लेखी मागणी बिल व नोटीसद्वारे व स्पीकरद्वारे सूचना देऊन सुद्धा जप्ती पूर्व नोटीस दिल्यानंतरही त्यांनी कराची रक्कम न भरल्याने त्याच्या नावाची यादी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल अशा सूचना दिल्या होत्या व सदर मालमत्ता धारकांनी कराची रक्कम न भरल्याने शहरातील 20 नळ कनेक्शन बंद करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी दिली पंढरपूर शहरामध्ये एकूण.(२१८२९) मालमत्ता धारक व.(५०००) झोपडपट्टी धारक आहेत ( 31)मार्च अखेर पाणीपट्टीसह एकूण मागणी रु.२५.५३.७६.७०२/आहे त्यापैकी ( 20 )मार्च ०२५ अखेर.१३.१२.६३.०३२/-इतका वसूल झाला आहे व ( 31) मार्च ०२५ अखेर.१२.४१.१३.६७०/येणे बाकी आहे सध्या वसुलीची टक्केवारी पाहता (५२) टक्के वसूल झाला आहे सदर वसुलीसाठी पंढरपूर नगर परिषदेतील.२५ कर्मचाऱ्यांच्यी.४ विशेष वसुली-जप्ती पथकाद्वारे कर वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे .कर वसुलीची मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने शहरातील (५०)...

जि.प. प्र शाळा कृतीनिष्ठ शिक्षिका पुरस्काराने सन्मानित !

Image
 जि.प.प्रा.शाळा शेगांव दुमाला शाळेतील उपशिक्षिका  वैशाली अभिमन्यू वाघमारे कृतीनिष्ठ शिक्षिका पुरस्काराने सन्मानित. पंढरपूर-काल जि.प.प्रा.शाळा शेगांव दुमाला केंद्र-बाभुळगांव ता-पंढरपूर येथील आदर्श,उपक्रमशिल व विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून सुपरिचित असलेल्या वैशाली अभिमन्यू वाघमारे-कोरे मॕडम यांना छत्रपती शिवाजी सांस्कृतिक व क्रीडा मंडळ मरवडेचेवतीने दरवर्षी देण्यात येणारा अतिशय सन्मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा कृतीनिष्ठ शिक्षिका हा पुरस्कार सौ वनमालाताई भगरे-अध्यक्ष स्व.आप्पा खंडू भगरे सामाजीक ट्रस्ट मरवडे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव प्राध्यापक शिवाजी काळुंगे यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला गेली २५ वर्ष विना प्रसिद्धी अतिशय तनमन धनाने ग्रामीण भागातील गोरगरिबांचे विद्यार्थ्यांंना ज्ञानदान करणाऱ्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,लेखन-वाचन स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,सामान्यज्ञान स्पर्धा,टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तूची कार्यशाळा,सांस्कृतिक कार्यक्रम खेळातून सहज व आनंदी शिक्षण अशा विविध उपक्रमातून विद्यार्थि घडविणार्या बाभुळगांव केंद्रातील कर्तव्यदक्ष...

दावत ए इफ्तार पार्टीचे आयोजन !

Image
पंढरपूर प्रतिनिधी - आज दिनांक 23 मार्च 2025 रोजी ,कोर्टी तालुका पंढरपूर येथे दावते ए इफ्तार पार्टीचे आयोजन राजू भाई मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते, यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवक नेते प्रणव परिचारक मालक उपस्थित होते. यावेळी सु.रा परिचारक पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश तात्या पाटील व मा सरपंच रघु पवार भाजपा अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष तमीम इनामदार होते.  यावेळी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवक नेते प्रणव परिचारक यांनी परिचारक कुटुंबांच्या वतीने  शुभेच्छा दिल्या. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌                     मोहसीन इसाक खान.                         (८६०५१७१९१७).                      रोहन हनुमंत हिवराळे.                       ...

सोलापुरात आयोजित केला जनता दरबार !

Image
  सोलापूर प्रतिनिधी - सोलापुरात आयोजित केला जनता दरबार ! सोलापूर मध्ये चे आमदार देवेंद्र कोठे हे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्त मागील तीन आठवडे मुंबईत होते आज सकाळी सोलापुरात आल्यानंतर कार्यालयात देव यज्ञ जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सकाळी दहा वाजल्यापासून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सामान्य नागरिकांचे प्रश्न समस्या जाणून घेतले त्यावर तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून सूचना दिल्या तसेच अनेक नागरिकांना विविध कारणासाठी शिफारस पत्र देत त्यांचे काम लवकर मार्ग लावण्यासाठी प्रयत्न केले यावेळी शहर तसेच मतदार संघातील सर्व स्तरातील नागरिकांची उपस्थिती होती.           लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌                     मोहसीन इसाक खान.                         (८६०५१७१९१७).                      रोहन हनुमंत हिवराळे. ...

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची वार्षिक तपासणी !

Image
  पंढरपूर प्रतिनिधी - कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षिक तपासणी दौऱ्यावर असून त्यांनी २० मार्च २०२५रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील वार्षिक तपासणीच्या दरम्यान उपविभागीय सर्व पोलीस ठाण्यांच्या वार्षिक कामगिरींचा आढावा घेऊन अभिलेखांची पडताळणी केली आहे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मुलाखती घेण्यात आले आहेत.  सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पंढरपूर येथे भेट देऊन पंढरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६५ एकर परिसरात वृक्षारोपण केले. त्यानंतर पंढरपूर पोलीस ठाणे अंतर्गत काळा मारुती या पोलीस चौकीचे उद्घाटन सुनील फुलारी , विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले  पंढरपूर शहर पोलीस ठाणे  येथील आगमनाच्या वेळी पंढरपूर शहरातील वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी व समस्त वारकरी विश्व वारकरी सेना व तसेच वारकरी संप्रदाय पाईक संघ यांच्याकडून भक्तिमय व पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्यात आले. पंढरपूर येथील सराफ असोसिएशन व्यापार समिती , पोलीस पाटील संघटना व इतर प्...

सांगोला तालुका पाणी टंचाई !

Image
 दिनांक २१/०३/२०२५ विशेष प्रतिनिधी -                        सांगोला तालुका पाणी टंचाई  च्या.उंबरठ्यावर माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे कोरडे पडले आहेत जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न. गंभीर झाला असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे काही गावांमध्ये जलजीवन मिशन ची कामे अपूर्ण असल्याचे मार्च एप्रिल.मे.या तीन महिन्यांत जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी सामना करावा लागणार आहे विज बिल थकीत असल्याने शिरभावी पाणीपुरवठा योजना तीन महिन्यांपासून बंद असून मान नदीवरील (१९) बंधारे व कोरडा नदीवरील (४) बंधारे ठणठणीत कोरडे पडले आहेत तालुक्यातील चिंचोली तलावात३५-९१.द.ल.ध.कू.(३८.६९ टक्के )अचकदानी तलावात शून्य टक्के.  जवळा तलावात  १६.३२.द.ल.ध.कू.(३४.९४ टक्के) घेरडी तलावात ४९.३६.द.ल.ध.कू.(४९.५२ टक्के) हंगीरगे तलावात.५.१८द.ल.ध.कू.(११.०१ टक्के) इतका पाणी साठा आहे लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌                     मोहसीन इसाक खान. ...

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !

Image
  दिनांक १९/०३/२०२५. पंढरपूर प्रतिनिधी-      लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपुर येथील वार्ड क्रमांक ( ४) प्रतिभाताई परिचारक नगर चे काँक्रेटी करण रस्त्याचे पूजन लक्ष्मी टाकळी चे सरपंच संजय देविदास साठे व उपसरपंच सौ रूपाली सागर.कारंडे व सदस्य सागर विनायक सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाला ह्यावेळी उपस्थित स्थानिक रहिवासी मिलिंद देवळ,पांडुरंग जानकर, हुसेन तांबोळी राजू शेख ,सलीम शेख यांनी रस्त्याचे काम सुरू झाल्याबद्दल सरपंच संजय देविदास साठे व उपसरपंच सौ रूपाली सागर कारंडे. ग्रामपंचायत सदस्य सागर विनायक सोनवणे यांचे आभार मानले.             लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व       बातम्यांसाठी संपर्क .‌                     मोहसीन इसाक खान.                          (८६०५१७१९१७).                      रोहन हनुमंत हिवराळे.         ...

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा !

Image
  दिनांक १८/०३/२०२५ विशेष प्रतिनिधी - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा.  घर बांधणाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय ,घरकुल बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मोफत वाळू देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. राज्यातील घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली राज्य सरकारच्या या निर्णयामुळे घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे ,बावनकुळे यांनी नागपूर मध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी मोफत वाळू देण्याच्या निर्णयाची घोषणा केली व बोलताना ते म्हणाले ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत ज्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लियरन्स मिळाला आहे त्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव होईल ,तसेच घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे त्यासाठीही आम्ही तरतूद करणार आहे अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌   ...

राज्यात उष्णतेची लाट !

Image
  दिनांक १८/०३/२०२५ राज्यात उष्णतेची लाट येणार उन्हाळा वाढत असून पुढील काही दिवसात ४०ते ५० अंश सेल्सियस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे , त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी पिणे टाळावे आणि साधे पाणी प्यावे असा सल्ला आरोग्य तज्ञांनी दिला आहे. दरम्यान सध्या इंडोनेशिया सिंगापूर आणि इतर देश उष्णतेची लाट अनुभवत आहे,तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यावर खूप थंड पाणी न पिण्याच्या सल्ला डॉक्टर देतात कारण असे केल्यास आपल्या लहान रक्तवाहिन्या फुटण्याची किंवा रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर कडक उन्हातून घरी आल्यावर लगेच हात पाय धुवू नका त्याआधी किंवा अंघोळ करण्याआधी किमान अर्धा तास थांबा त्यानंतर अंघोळ करा असे न केल्यास त्या व्यक्तीला स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते व लहान मुले , वयोवृद्ध व्यक्तींना विशेष काळजी घेणे असेही आरोग्य तज्ञांनी सांगितले आहे. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌              मोहसीन इसाक खान.             ...

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना श्री तुकाराम महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले !

Image
  दिनांक. १७/०३/२०२५ विशेष प्रतिनिधी जगद्गगुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या (३७५) जयंतीनिमित्त औचित्य साधून श्री क्षेत्र देहू देवस्थान समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना जगद्गगुरु तुकाराम महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचा विनम्रपणे स्वीकार करून मंदिर समितीचे याप्रसंगी विशेष आभार मानले यावेळी बोलताना हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून समस्त वारकरी धारकरी कष्टकरी शेतकरी आणि लाडक्या बहिण भावंडांचा असल्याचे मत व्यक्त केले. संत तुकाराम महाराजांनी (३७५) वर्षापूर्वी लिहिलेल्या गाथांमधील तत्त्वज्ञान सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत लिहून ठेवले खरं,तर मराठी भाषेचा अभिजातपणा सिद्ध करण्याचा हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे मत यासमयी व्यक्त केले धर्माच्या रक्षणाप्रमाणे निसर्गचे रक्षण करणे हेदेखील आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, इंद्रायणी नदीला भेट दिली होती या नदीच्या शुद्धीकरण प्रकल्पाच्या विकास अहवाल तयार असून त्यालाही मी मान्यता दिलेली आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले मात्र नुसते शासनाचे नव्हे तर आपण सर्वांनी न...

एम पी डी ए कायद्याअंतर्गत करकंब पोलिसांची कारवाई!

Image
  दिनांक  १५/०३/२०२५   प्रतिनिधी- करकंब पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार दोन पेक्षा जास्त दखलपात्र गुन्हे दाखल असून करकंब पोलिसांची.एम पी डी ए कायदया अंतर्गत सराईत गुन्हेगार बालाजी पवार वर कारवाई सदरच्या करकंब.पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्ताव मधील खेड भोसे गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम बालाजी हनुमंत पवार रा .खेड भोसे तालुका पंढरपूर यांच्यावर करकंब पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे अंतर्गत खुनाचा प्रयत्न वाळू चोरी विनयभंग जबरी चोरी मारामारी आशा विविध गुन्हे मध्ये सक्रिय असुन त्यास दोन वेळा तडीपार करूनही तो वारंवार गुन्हे करीत होता अलीकडच्या काळात त्याने नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमधील जबरी चोरी करीत मोटार सायकल चोरून नेली होती त्यानंतर करकंब पोलिसांनी त्याच्यावर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करून एम पी डी ए कायद्यातील तरतुदी नुसार.त्याच्या विरुद्ध कारवाई केलेली होती सदरच्या प्रस्तावावर माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टी वाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती वाळू तस्कर आणि अत्यावश...

जळगाव जिल्ह्यात एक दुर्घटना !

Image
दिनांक -१४/०३/२०२५. विशेष प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातून एक दुर्घटनेची मोठी बातमी मुंबईवरून येणाऱ्या मुंबई अमरावती एक्सप्रेस ने धान्याच्या ट्रकला धडक दिल्याने अपघाताची घटना घडली. बंद असलेला रेल्वे गेट भेदून भरधाव ट्रक हा रेल्वे ट्रॅक वर आला यामुळे रेल्वे आणि ट्रकची धडक झाली आज पहाटेच्या सुमारास भुसावळ जवळ असलेल्या बोदवड रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली.नाही मात्र वाहतुकीवर मोठा परिणाम झाला अपघात झाल्याने वाहतूक टप्प झाली यादरम्यान यामध्ये नवजीवन एक्सप्रेस सुरत भुसावळ पॅसेंजर जळगाव स्थानकावर थांबवण्यात आल्या तर आमदाबाद पुरी एक्सप्रेस भुनेश्वर एक्सप्रेस हावडा एक्सप्रेस भुसावळ आणि वरणगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌            मोहसीन इसाक खान.                (८६०५१७१९१७).            रोहन हनुमंत हिवराळे.         ...

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी !

Image
  कसबा पेठ पुणे विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण उचलला आणि भगवा हाती घेतला रवींद्र धंगेकर हे पुण्याचे लोकप्रिय नेते म्हणून  सुपरिचित आहेत त्यांनी आपल्या कामातून आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली. २५ वर्ष ते नगरसेवक होते त्यापैकी १०.वर्ष शिवसेनेचे नगरसेवक होते शिवसेनेत आल्याने पुन्हा एकदा त्यांना.समाधान मिळेल तसेच त्यांच्या कामाची पद्धत आणि दांडगा जनसंपर्क पाहता लवकरच पुण्यातून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत येतील या यासमयी नमूद केले काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहतो त्यामुळे तुमच्या पाठीशी मी नक्कीच उभा राहीन असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.  याप्रसंगी शिवसेनेचे नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे उद्योग मंत्री उदय सामंत आमदार शरद सोनवणे आमदार प्रकाश सुर्वे आमदार मुरजी पटेल माजी आमदार राजन साळवी जिल्हाप्रमुख अजय भोसले जिल्हाप्रमुख रमेश कोंडे शहर प्रमुख प्रमोद नाना पा...

उपसा सिंचनाबाबत महत्वपूर्ण बैठक पार पडली!

Image
  म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेशी संबंधित विविध मागण्यांबाबत आज जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मा. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सिंचन योजनेच्या प्रलंबित कामांवर चर्चा करत तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मुख्य ठराव आणि निर्णय: १) म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध करणे – प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण ५५० कोटी रुपयांची गरज असल्याचे नमूद करण्यात आले. यातील २७५ कोटींची पुरवणी मागणी चालू आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आली असून उर्वरित २७५ कोटी पुढील आर्थिक वर्षात तत्काळ उपलब्ध करून दिले जातील, असा निर्णय घेण्यात आला. २) यांत्रिकी व विद्युत कामांची निविदा प्रक्रिया – सद्यस्थितीत ७८% कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामांसाठी तातडीने निविदा काढण्याची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. यानुसार: यांत्रिकी कामांसाठी ५० कोटी रुपयांची निविदा विद्युत कामांसाठी ३८ कोटी रुपयांची निविदा या निविदा एप्रिल २०२५ मध्ये काढण्यास मान्यता देण्यात आली. ३) तलाव भरण नलिकेच्या निविदा  म्हैसाळ विस्तारित जत ...

सांगोला महावितरणाचे बिल थकीत !

Image
  महावितरण चे सांगोल्यात अडीच कोटी थकीत सांगोला व हातीद महावितरण कार्यालयाकडील घरगुती व व्यावसायिक ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे थकबाकीदार वीज.ग्राहकांनी थकबाकी न भरल्यास त्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता गणेश पोवार व उपकार्यकारी अभियंता हनुमंत बनसोडे यांनी सांगितले. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .            मोहसीन इसाक खान                 (८६०५१७१९१७)            रोहन हनुमंत हिवराळे                ( ८६६८६१००५०)

मुंबई महानगरपालिकेची विशेष आढावा बैठक!

Image
  मुंबई महानगरपालिकेच्या विविध पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनातील त्यांच्या कार्यालयात विशेष बैठक पार पडली.  यावेळी या पायाभूत प्रकल्पांची सध्या सद्यस्थिती जाणून घेत ही कामे अधिक वेगाने पूर्ण करण्याबाबत काही महत्त्वाचे सूचना देण्यात आल्या यावेळी मुंबई मनपाचे आयुक्त भूषण गगराणी मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव सचिन श्रीकर परदेशी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता प्रधान सचिव नवीन सोना तसेच मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .            मोहसीन इसाक खान                 (८६०५१७१९१७)            रोहन हनुमंत हिवराळे                ( ८६६८६१००५०)

मीरा-भाईंदर शहरातील मेट्रो !

Image
  मीरा-भाईंदर शहरातील मेट्रो मार्ग नऊ लगत तयार करण्यात आलेल्या उड्डाणपूल क्रमांक दोनचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहान संपन्न झाला.  हा उड्डाणपूल एस.स्टोन जंक्शन जवळील साईबाबा नगर मेट्रो स्थानकापासून सुरू होऊन शिवार गार्डन पर्यंत असेल यामुळे स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीच्या. त्रासातून.मोठा दिलासा मिळणार आहे याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार नरेंद्र मेहता मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा मोहन शर्मा ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे तसेच मीरा-भाईंदर येथील महायुतीचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .            मोहसीन इसाक खान                 (८६०५१७१९१७)            रोहन हनुमंत हिवराळे                ( ८६६८६१००५०)

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबल विजयकुमार आवटे यांनी पटकवले सुवर्णपदक व रौप्य पदक!

Image
  पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबल विजयकुमार आवटे यांनी पटकवले सुवर्णपदक व रौप्य पदक !  राज्य ओडिसा येथे घेण्यात आलेल्या सातवी नॅशनल मास्टर गेम्स फेडरेशन इन इंडिया या स्पर्धेमध्ये विजयकुमार आवटे सोलापूर ग्रामीण तालुका पोलीस ठाणे यांनी 800 मीटर रनिंग मध्ये सुवर्णपद व  1500मीटर स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलेले आहे. बिरसा मुंडा अथलेटिक स्टेडियम रावर केला राज्य ओडिसा स्टेडियम ही स्पर्धा पार पडली व आता त्यांची श्रीलंका येथे होणाऱ्या इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झालेले आहे.सोलापूर ग्रामीण पोलीसदल कडून अनेक स्पर्धेमध्ये पदके मिळवून दिली आहेत. तरी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .                            मोहसीन इसाक खान                                (८६०५१७१९१७)                       ...

जागतिक महिला दिन साजरा!

Image
  ०८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त  महिलांना विशेष कार्याबद्दल स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना पंढरपूर शहर व तालुका कार्यकरणी यांच्या वतीने कर्तव्यदक्ष महिलांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.           स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दीपक जी कांबळे सर व सन्माननीय महासचिवजी श्री कमलेशजी शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व संस्थेच्या विश्वस्ता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ धनश्रीताई उत्पात व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री श्रीराम भाऊ बडवे यांच्या प्रेरणेने व पुढाकाराने आज ०८ मार्च जागतिक महिला  दिनानिमित्त पंढरपूर शहर पोलीस स्टेशन व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीने महिला स्वसंरक्षण शिबिर राबविण्यात आले या शिबिराच्या वेळेस उपस्थित व सहभागी 200 अधिक विद्यार्थिनी याना आपल्या स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या वतीन कर्तव्यदक्ष महिलांचा सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे प...

माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गला!

Image
  माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गला जोडणाऱ्या जालना नांदेड  मार्गावरील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या भूसंपादनाबाबत विविध प्रश्नांसाठी आणि जालना शहरातील विविध प्रकल्पासंदर्भात  विधानभवनातील महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या दालनात विशेष बैठक पार पडली .                                                           या   वेळी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे आमदार अर्जुन खोतकर आमदार हेमंत पाटील आमदार बाबुराव कदम कोहळीकर आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता प्रधान सचिव नवीन सोना एम एस आरडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .                            मोहसीन इसाक खान                   ...