जागतिक महिला दिन साजरा!
०८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना विशेष कार्याबद्दल स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना पंढरपूर शहर व तालुका कार्यकरणी यांच्या वतीने कर्तव्यदक्ष महिलांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दीपक जी कांबळे सर व सन्माननीय महासचिवजी श्री कमलेशजी शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व संस्थेच्या विश्वस्ता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ धनश्रीताई उत्पात व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री श्रीराम भाऊ बडवे यांच्या प्रेरणेने व पुढाकाराने आज ०८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पंढरपूर शहर पोलीस स्टेशन व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीने महिला स्वसंरक्षण शिबिर राबविण्यात आले या शिबिराच्या वेळेस उपस्थित व सहभागी 200 अधिक विद्यार्थिनी याना आपल्या स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या वतीन कर्तव्यदक्ष महिलांचा सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रमुख मा.अंजना कृष्णा व्ही एस आयपीएस अधिकारी, पंढरपूर शहर निर्भया पथक प्रमुख पीआय एम खडके पाटील मॅडम त्यांचे सहकारी सौ रावण मॅडम सौ रेळेकर मॅडम सौ क्षीरसागर मॅडम सौ बैनवाड मॅडम या प्रमुख महिला अधिकारी यांचा संघटनेच्या वतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉक्टर सौ संगीता पाटील ,आदर्श बाल व प्राथमिक मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ माया सांगोलकर व त्यांच्या सर्व सहकारी भगिनी यांना मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले व यावेळी आपले संघटनेची माहिती पंढरपूर शहरचे अध्यक्ष रवी सोनार यांनी दिली तसेच समाजातील आदर्श महिला उद्योजक अर्चना खांडेकर यांचा यावेळी सन्मानपत्र देऊन संघटनेतर्फे सन्मान करण्यात आला.
या वेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री कैलास कारंडे पंढरपूर तालुका अध्यक्ष श्री प्रवीण सुरवसे पंढरपूर शहराध्यक्ष श्री रवी सोनार तसेच पंढरपूर तालुका व शहर पदाधिकारी श्री नागेश राहीलकर, श्री प्रकाश अलदर,श्री गंगाधर स्वामी ,श्री शंकर कवडे ,श्री दत्तात्रय कमले, श्री राम अभंगराव,श्री संतोष राऊत, यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले यावेळी संघटनेचे तालुका व शहर चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान
(८६०५१७१९१७)
रोहन हनुमंत हिवराळे
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment