सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची वार्षिक तपासणी !
पंढरपूर प्रतिनिधी -
कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षिक तपासणी दौऱ्यावर असून त्यांनी २० मार्च २०२५रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील वार्षिक तपासणीच्या दरम्यान उपविभागीय सर्व पोलीस ठाण्यांच्या वार्षिक कामगिरींचा आढावा घेऊन अभिलेखांची पडताळणी केली आहे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मुलाखती घेण्यात आले आहेत.
सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पंढरपूर येथे भेट देऊन पंढरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६५ एकर परिसरात वृक्षारोपण केले. त्यानंतर पंढरपूर पोलीस ठाणे अंतर्गत काळा मारुती या पोलीस चौकीचे उद्घाटन सुनील फुलारी , विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले
पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथील आगमनाच्या वेळी पंढरपूर शहरातील वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी व समस्त वारकरी विश्व वारकरी सेना व तसेच वारकरी संप्रदाय पाईक संघ यांच्याकडून भक्तिमय व पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्यात आले. पंढरपूर येथील सराफ असोसिएशन व्यापार समिती , पोलीस पाटील संघटना व इतर प्रतिष्ठित संघटनेंकडून सत्कार करण्यात आले.
पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी दरम्यान वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्रक देऊन कामगिरीचे कौतुक करण्यात आले. त्यानंतर पोलीस ठाण्याकडील तपासणी घेऊन पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या अडीअडचणी ऐकून तात्काळ उपाय सुचवण्यात आले.
२१ मार्च २०२५ रोजी रात्री उशिरापर्यंत सांगोला पोलीस ठाण्याची तपासणी सुरू असून उद्या दिनांक २२ मार्च२०२५ रोजी सोलापूर येथील वार्षिक तपासणी घेण्यात येणार आहे.
सदर दौऱ्याप्रसंगी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंजना कृष्णा सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल मडावी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी हजर होते.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
.
Comments
Post a Comment