माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी !

 कसबा पेठ पुणे विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण उचलला आणि भगवा हाती घेतला रवींद्र धंगेकर हे पुण्याचे लोकप्रिय नेते म्हणून  सुपरिचित आहेत त्यांनी आपल्या कामातून आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली.


२५ वर्ष ते नगरसेवक होते त्यापैकी १०.वर्ष शिवसेनेचे नगरसेवक होते शिवसेनेत आल्याने पुन्हा एकदा त्यांना.समाधान मिळेल तसेच त्यांच्या कामाची पद्धत आणि दांडगा जनसंपर्क पाहता लवकरच पुण्यातून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत येतील या यासमयी नमूद केले काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहतो त्यामुळे तुमच्या पाठीशी मी नक्कीच उभा राहीन असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला. 

याप्रसंगी शिवसेनेचे नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे उद्योग मंत्री उदय सामंत आमदार शरद सोनवणे आमदार प्रकाश सुर्वे आमदार मुरजी पटेल माजी आमदार राजन साळवी जिल्हाप्रमुख अजय भोसले जिल्हाप्रमुख रमेश कोंडे शहर प्रमुख प्रमोद नाना पान भानगिरे युवा सेनेचे किरण साळी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.



      लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क             जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .

           मोहसीन इसाक खान  

              (८६०५१७१९१७)

           रोहन हनुमंत हिवराळे

               ( ८६६८६१००५०)


Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !