जमिनीच्या वादातून ठार मारल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा !
सांगोला ( प्रतिनिधी )
उदनवाडी तालुका सांगोला जमीनीच्या वादातून गोळीबार करून एकाच ठार मारल्या प्रकरणी आरोपी बिरू पांढरे यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
तसेच ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे पंढरपूर येथील जिल्हा न्यायाधीश डी एन सुरवसे यांनी हा निकाल दिला आहे.उदनवाडी तालुका सांगोला येथील गट क्रमांक ६८ मध्ये १९जुलै२०२४ रोजी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. फिर्यादी दत्तात्रय पांढरे यांनी खरेदी केलेल्या जमिनीवर आरोपी बिरू पांढरे व इतरांनी जमाव जमवून हल्ला केला .आरोपी बिरू पांढरे जो भारतीय लष्करात नोकरीस होता त्याने स्वतःकडील बंदुकीतून गोळीबार करून उज्वला पांढरे हिला ठार मारले ,तसेच इतर आरोपींनी फिर्याद व साक्षीदारांना लोखंडी पाईप व दगडफेकीने जखमी केली या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात १९ जुलै २०२४ रोजी भादंवि.कलम ३०२:३०७:१४३:१४७:१४८:१४९:आर्म्स अक्ट.३:२५ आणि मुंबई पोलीस कायदा कलम १३५: अन्वये.गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अजय कदम यांनी तपास करून आरोपीविरुद्ध पंढरपूर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र केले होते सरकार पक्षातर्फे एकूण१८ साक्षीदार तपासण्यात आले फिर्यादी प्रत्यक्षदर्शी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
न्यायालयाने सर्व पुरावे विचारात घेत आरोपी बिरू पांढरे याला दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. इतर आरोपींना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आले,यात सरकारी वकील म्हणून सारंग वांगीकर यांनी कामकाज चालविले. सदर गुन्ह्यांचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अजय कदम यांनी केला. सदरची ठळक बातमी आरोपी बिरू पांढरे भारतीय लष्करात नोकरीस असून तो मुलाच्या बारशासाठी गावी आला असताना वाद झाला. गोळीबार करून उज्वला पांढरे हिला ठार मारल्यानंतर आरोपी सुमारे ६ महिने फरार होता ,पोलिसांनी वेशांतर करुन शोध घेतल्यानंतर त्यास अटक करण्यात आली गुन्ह्यात वापरलेली बंदूक जप्त होऊ शकली नाही आरोपीनी.ती विहिरीत टाकल्याचे सांगितले मात्र पोलिसांना ती बंदूक मिळाली नाही आरोपीला अटक झाल्यापासून जामीन मंजूर झाला नव्हता.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment