पंढरपूर नगर परिषदेची कर वसुली मोहीम !
पंढरपूर प्रतिनिधी -
पंढरपूर नगरपरिषदेची कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतले आहे ,पंढरपूर नगर परिषदेने शहरातील थकीत मालमत्ता धारकांना करांची रक्कम भरणे बाबत वारंवार लेखी मागणी बिल व नोटीसद्वारे व स्पीकरद्वारे सूचना देऊन सुद्धा जप्ती पूर्व नोटीस दिल्यानंतरही त्यांनी कराची रक्कम न भरल्याने त्याच्या नावाची यादी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल अशा सूचना दिल्या होत्या व सदर मालमत्ता धारकांनी कराची रक्कम न भरल्याने शहरातील 20 नळ कनेक्शन बंद करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी दिली पंढरपूर शहरामध्ये एकूण.(२१८२९) मालमत्ता धारक व.(५०००) झोपडपट्टी धारक आहेत ( 31)मार्च अखेर पाणीपट्टीसह एकूण मागणी रु.२५.५३.७६.७०२/आहे त्यापैकी ( 20 )मार्च ०२५ अखेर.१३.१२.६३.०३२/-इतका वसूल झाला आहे व ( 31) मार्च ०२५ अखेर.१२.४१.१३.६७०/येणे बाकी आहे सध्या वसुलीची टक्केवारी पाहता (५२) टक्के वसूल झाला आहे सदर वसुलीसाठी पंढरपूर नगर परिषदेतील.२५ कर्मचाऱ्यांच्यी.४ विशेष वसुली-जप्ती पथकाद्वारे कर वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे .कर वसुलीची मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने शहरातील (५०)हजाराच्या वर थकबाकी असणाऱ्या. (२०००) मालमत्ता धारकांची थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून या थकबाकीदारांना पुरेशी व वाजवी संधी देवुनही त्यांनी थकबाकी रक्कम न भरल्याने अशा मालमत्ता धारकांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल अशा सूचनाही दिल्या व स्पीकर द्वारे त्यांच्या घरासमोर थकबाकीची रक्कम भरावी म्हणून नावे पुकारण्यात आले आहेत तसेच महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ मधील कलम १५२ मधील तरतुदीनुसार थकबाकी.दारांना जप्तीची कारवाई करण्याची नोटीस देण्यात आलेले आहेत सदर मालमत्ता धारकाने थकबाकीची रक्कम न भरल्याने नगर परिषदेने सुरू केलेल्या कर वसुली धडक मोहिमेमध्ये शहरातील वेगवेगळ्या भागातील एकूण २० मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत तसेच १० हजाराच्या पुढे थकबाकी आहे अशाही मालमत्ता धारकांची नावे वृत्तपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशा थकबाकीदार मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव व कर अधिकारी सुप्रिया शिंदे यांनी दिले आहे सदरची विशेष धडक मोहीम प्रशासक तथा उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे व मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव उपमुख्यअधिकारी सुनील वाळूजकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधिकारी सुप्रिया शिंदे. भांडार व खरेदी पर्यवेक्षक विजय शहाणे. सहाय्यक कर निरीक्षक अंजली काबुगडे. वॉरंट लिपिक संभाजी देवकर. प्रशासकीय अधिकारी रवींद्र सूर्यवंशी. सहाय्यक कार्यालय अधीक्षक सुवर्णा हाके. या पथक प्रमुखांच्या समवेत.८ वसुली लिपिक व ४ शिपाई सहित जप्तीच्या कारवाईसाठी ४.पदके.व.४ वाहने कार्यरत असल्याची माहिती कर अधिकारी सुप्रिया शिंदे यांनी दिली आहे.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment