पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे धडाकेबाज कामगिरी!
पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी.
देशी बनावटीची पिस्टल सह आरोपीस केले जेरबंद.श्री अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग , पंढरपूर व सहा पोलीस अधीक्षक अंजना कृष्ण व्ही एस मॅडम सो यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २६/०३/२०२५रोजी २१:००चे सुमारास गुन्हे प्रगटीकरण पथकासह पो.ठाणे हद्दीतील गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असता गुप्त बातमीदाराकरवी माहिती प्राप्त झाली की, पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील जुना अकलूज रोड, पुणे हायवेच्या ब्रिज खाली एक इसम त्याचे जवळ देशी बनावटीचे रिव्हालवर बाळगून फिरत आहे.
सदर बातमी बाबत सहा पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा मॅडम यांनी आम्हा गुन्हे प्रकटीकरण शाखेत हकीकत सांगून सदर प्राप्त माहितीची खातरजमा करून कारवाई करणे,कामी पथक तात्काळ रवाना केली सदर ठिकाणी सापळा रचून संशयित इसम नामे अरविंद भीमराव अटकळे-३२ वय वर्ष राहणार कौठाळी ता,पंढरपूर जि. सोलापूर या ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेस एक देशी बनावटीचे पिस्टल मॅक्झिनसह मिळून आले ते पुढील कारवाई कामी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३,२५,अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी सो, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर श्री अर्जुन भोसले सो.यांच्या मार्गदर्शनाखाली मा सहा. पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा मॅडम,गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई अनिल पाटील, पोसई वीरसेन पाटील,पो.कॉ इरफान मुलानी, पो.कॉ शोएब पठाण , पो. कॉ.अजित मिसाळ, गणेश पाटील यांनी केली आहे.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment