माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग व रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले !
पंढरपूर प्रतिनिधी
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग व रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले .
यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह पंढरपूर मंगळवेढा युवा नेते प्रणव परिचारक , आमदार अभिजीत पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार बाबासाहेब देशमुख , सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखडा अंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व त्यांना मार्गदर्शन केले .
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment