एम पी डी ए कायद्याअंतर्गत करकंब पोलिसांची कारवाई!

 दिनांक  १५/०३/२०२५


 प्रतिनिधी-

करकंब पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार दोन पेक्षा जास्त दखलपात्र गुन्हे दाखल असून करकंब पोलिसांची.एम पी डी ए कायदया अंतर्गत सराईत गुन्हेगार बालाजी पवार वर कारवाई सदरच्या करकंब.पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्ताव मधील खेड भोसे गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम बालाजी हनुमंत पवार रा .खेड भोसे तालुका पंढरपूर यांच्यावर करकंब पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे अंतर्गत खुनाचा प्रयत्न वाळू चोरी विनयभंग जबरी चोरी मारामारी आशा विविध गुन्हे मध्ये सक्रिय असुन त्यास दोन वेळा तडीपार करूनही तो वारंवार गुन्हे करीत होता अलीकडच्या काळात त्याने नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमधील जबरी चोरी करीत मोटार सायकल चोरून नेली होती त्यानंतर करकंब पोलिसांनी त्याच्यावर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करून एम पी डी ए कायद्यातील तरतुदी नुसार.त्याच्या विरुद्ध कारवाई केलेली होती सदरच्या प्रस्तावावर माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टी वाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे व्यक्तीच्या वीघातक कृत्यांना प्रतिबंधक सुधारित अधिनियम. 2015 चे कलम ३(१) प्रमाणे ०१ वर्षांकरिता. दिनांक १०/०३/२०२५ रोजी आदेशित करून त्यास स्थानबद्ध केले असता दोन दिवस पोलिसांनी हुलकावणी देणारा सराईत गुन्हेगार बालाजी पवार यास करकंब पोलीस पथकाने दिनांक ११/०३/२०२५ रोजी बस स्थानक मोहोळ येथून ताब्यात घेऊन येरवडा जेल पुणे येथे रवानगी केलेली आहे तसेच यापुढे रेकॉर्ड वरील सर्व गुन्हेगार दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेले आरोपी हातभट्टी वाले वाळू तस्कर गुंड व दादा व गुन्हेगारी टोळीवर करकंब पोलीस तडीपार हद्दपार व स्थानबद्ध कडक.कारवाई करणार आहेत असे सांगितले सदरची कामगिरी मा जिल्हाधिकारी सोलापूर नायब.तहसीलदार सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर डॉ.अर्जुन भोसले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाण्याचे प्रभारी सह पोलीस निरीक्षक सागर कुंजीर) पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड) पोलीस उपनिरीक्षक संजय मुळे) यांच्यासह.सफो/शेंडगे आर आर जाधव मोरे कांबळे सागर भोसले.शिकतोडे हजारे लेंगरे गायकवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखे कडील अनिस शेख यांनी कामगिरी बजावली आहे.



           लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌

                     मोहसीन इसाक खान.  

                      (८६०५१७१९१७).

                      रोहन हनुमंत हिवराळे.

                      ( ८६६८६१००५०).




Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !