जेल रोड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी !

 सोलापूर शहर प्रतिनिधी -


सोलापूर शहरात एका चार चाकी वाहनातून बेकायदेशीर विदेशी दारूच्या बाटल्या घोडा जोडबसवण्णा चौक ते जिजामाता दवाखाना मार्गे जाणार असल्याची अवैध वाहतूक जेलरोड पोलिसांनी हाणून पाडला चार चाकी वाहनांसह तीन लाख बारा हजार तिनशेदहा.रुपये.चा मुद्देमाल जप्त केला आहे .

यात मिळालेली माहिती अशी की जेलरोड ठाणे कार्यक्षेत्रात रमजान सणानिमित्त पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी तपास किटसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत व सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार गंगावणे,नदाफ खान व पोलीस कॉन्स्टेबल सिनारे असे सर्वजण पेट्रोलिंग करीत होते .

गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली ग्रे कलरच्या मारुती सुझुकी व्हॅगनार मध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्या जोडबसवण्णा ते जिजामाता दवाखान्या मार्गे वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा लावून चार चाकी वॅगनारच्या चालकाला जिजामाता दवाखाना ते जेलरोड पोलीस ठाणे दरम्यान असलेल्या नेताजी सुभाष चंद्रबोस बगीच्या जवळ आंबिवली त्याच्याकडे चौकशी केली असता उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याने विश्वासात घेऊन गाडीची पाहणी केली यावेळी गाडीत 11 खाकी पुठ्ठ्याच्या बॉक्स व पाच पांढऱ्या पिशव्यात विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या त्याच्याकडून एक वेगनर कारसह एकूण तीन लाख बारा हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच संशयित आरोपीला पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे.





             ‌लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌


                    मोहसीन इसाक खान.  

                       (८६०५१७१९१७).

                     रोहन हनुमंत हिवराळे.

                       ( ८६६.८६१००५०)

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !