महसूल प्रशासनाची धडाडीची कारवाई !


पंढरपूर  (प्रतिनिधी )

पंढरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा वाहतूक केली जात असुन याबाबत अनेक वेळा तक्रारी येत असल्याने महसूल प्रशासन सतर्क झाले आणि त्यांनी अचानक कारवाई केली.

पंढरपूर उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे व पंढरपूर तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर जवळील चंद्रभागा नदी पात्रामध्ये ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या तीन थरर्माकोल तराफे नष्ट करण्यात आल्या आहेत या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंकज राठोड ,संतोष सुरवसे ,ग्राम महसूल अधिकारी साईनाथ अडगटाळे ,अनिल बागल सरताज मुजावर ,गणेश पिसे ,रविकिरण लोखंडे ,लोकरे व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी हे कारवाई करण्यासाठी सहभागी झाले होते.




लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌

               मोहसीन इसाक खान.  

                (८६०५१७१९१७).

               रोहन हनुमंत हिवराळे.

                 ( ८६६८६१००५०)

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !