महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा !
दिनांक १८/०३/२०२५
विशेष प्रतिनिधी -
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा.
घर बांधणाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय ,घरकुल बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मोफत वाळू देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. राज्यातील घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली राज्य सरकारच्या या निर्णयामुळे घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे ,बावनकुळे यांनी नागपूर मध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी मोफत वाळू देण्याच्या निर्णयाची घोषणा केली व बोलताना ते म्हणाले ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत ज्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लियरन्स मिळाला आहे त्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव होईल ,तसेच घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे त्यासाठीही आम्ही तरतूद करणार आहे अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०).
Comments
Post a Comment