उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना श्री तुकाराम महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले !
दिनांक. १७/०३/२०२५
विशेष प्रतिनिधी
जगद्गगुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या (३७५) जयंतीनिमित्त औचित्य साधून श्री क्षेत्र देहू देवस्थान समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना जगद्गगुरु तुकाराम महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचा विनम्रपणे स्वीकार करून मंदिर समितीचे याप्रसंगी विशेष आभार मानले यावेळी बोलताना हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून समस्त वारकरी धारकरी कष्टकरी शेतकरी आणि लाडक्या बहिण भावंडांचा असल्याचे मत व्यक्त केले. संत तुकाराम महाराजांनी (३७५) वर्षापूर्वी लिहिलेल्या गाथांमधील तत्त्वज्ञान सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत लिहून ठेवले खरं,तर मराठी भाषेचा अभिजातपणा सिद्ध करण्याचा हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे मत यासमयी व्यक्त केले धर्माच्या रक्षणाप्रमाणे निसर्गचे रक्षण करणे हेदेखील आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, इंद्रायणी नदीला भेट दिली होती या नदीच्या शुद्धीकरण प्रकल्पाच्या विकास अहवाल तयार असून त्यालाही मी मान्यता दिलेली आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले मात्र नुसते शासनाचे नव्हे तर आपण सर्वांनी नदी स्वच्छतेची चळवळ ही लोचळवळ करायला हवी अशी अपेक्षा यावेळी बोलताना व्यक्त केली,
तसेच यानंतर संतश्रेष्ठ जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या मंदिरात जाऊन मोठ्या भक्ती भावाने त्यांचे दर्शन घेतले यावेळी उपस्थित देहू देवस्थान समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे ,खासदार श्रीरंग बारणे; आमदार विजय बापू शिवतारे; आमदार शरद सोनवणे; पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार; धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे अक्षय महाराज भोसले तसेच विविध संत देवस्थानाचे विश्वस्त आवर्जून उपस्थित होते.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०).
Comments
Post a Comment