शासकीय गोदामातून वाळू माफी यांनी वाहने पळवली !
शासकीय गोदामातून वाळूमाफीया यांनी वाहने पळवली ! सांगोला (प्रतिनिधी) सांगोला शासकीय गोदाम येथील प्रकार कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी. कोरडा नदीतून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करताना महसूल प्रशासनाने पकडून जप्त केलेल्या वाहनांपैकी तिघांनी मिळून संगणमताने दंड न भरण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टर व टेम्पो पळवून नेला तसेच त्या ठिकाणी लावलेल्या इतर वाहनांचे टायर काढून वाहनांच्या काचा फोडून शोची तोडफोड करून नुकसान केले आहे. ही घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास शासकीय गोदाम सांगोला या ठिकाणी उघडकीस आली आहे याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी गौरव शशिकांत कुंभार यांनी फिर्यादी दिली असून पोलिसांनी ते का विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तहसीलदार संतोष कनसे यांच्या आदेशान्वये २४ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता सांगोला तालुक्यातील मान कोरडा नदीपात्रातून चोरून वाळूचे वाहतूक करताना महसूल प्रशासनाने पकडून जप्त केलेली १६ वाहने दंडात्मक कारवाई करून सांगोला तहसील कार्यालयात लावली होती दरम्यान तहसीलदार संतोष कणसे यांच्या आदेशान्वये २४ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता सदरची वाळू चोरीतील सोळा वाहने शासकीय धा...