औसा चे आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नांना यश !
औसा चे आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नांना यश !
सातत्य पूर्व पाठपुराव्याला यश लातूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जून २०२५पासून सुरू करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी २०२३ पासून करत असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय २०२५ पासून सुरू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे पाच जुलै २०२४ रोजी लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विषय सभागृहात मांडला होता त्यानंतर विनंतीवरून लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ११ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली होती या बैठकीत दादांनी लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या सदर प्रस्ताव अर्थ मंत्रालय प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अकरा मार्च रोजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय श्री अजित दादा पवार यांच्या विधिमंडळ प्रांगणात भेट घेऊन त्यांनाही हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याची विनंती केली होती त्यानंतर १८ मार्च रोजी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता लातूर हे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते पण लातूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून महागडे शिक्षण घ्यावे लागते लातूर अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाल्यानंतर लातूरसह धाराशिव नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ रावजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा पवार उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील व पालकमंत्री माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मानले.
मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment