ॲड. संदिप कागदे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले !
पंढरपूर येथील विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ॲड. संदीप कागदे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने ॲड. संदिप कागदे यांना प्रबुद्ध विधीज्ञ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या.जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात अॅव्होकेट संदिप कागदे यांना प्रबुद्ध विधीज्ञ राज्यस्तरीय पुरस्कार माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले .
यावेळी प्राचार्य डॉ बी पी रोंगे, माढा विधानसभा आमदार अभिजीत पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल सावंत, शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे, पंढरपूर नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डी राज सर्वगोड ,नितीन काळे ,अध्यक्ष विलास जगधने ,सचिन अनिल ननवरे ,श्रीकांत चंदनशिवे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ॲड.संदिप कागदे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वातुन त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment