जवळा येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई !

 जवळा येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई !

कोरडा नदीत पात्रात छापा टाकून १४ हजार रुपये किंमतीच्या दोन ब्रास वाळू सह चार लाखाचा आयशर टेम्पो सह एकाच जागीच पकडले कारवाईदरम्यान पोलीस आल्याची चाहूल लागतात चालकांनी जेसीपी मशीन सह ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन पळून गेले ही कारवाई रविवारी सकाळी ११:०० च्या सुमारास जवळा तालुका सांगोला येथील कोरडा नदीपात्रात केली. 

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी यांनी फिर्यादी दिली याप्रकरणी टेम्पो चालक अतुल शंकर गावडे राहणार गावडेवाडी जवळा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तर पळून गेलेले जेसीबी वर ट्रॅक्टर वरील अज्ञात चालकांचा शोध सुरू आहे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी पोलीस कॉन्स्टेबल मारुती पांढरे पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम नदाफ रविवारी खाजगी वाहनाने अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी घेरडी दूरक्षेत्र हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते सकाळी ११:००च्या सुमारास जवळा येथील कोरडा नदीपात्रामध्ये जेसीबी ट्रॅक्टर वर टेम्पोच्या साह्याने वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली आरोपी जेसीपी मशीनच्या साह्याने ट्रॅक्टरवर टेम्पो मधील वाळूचा करून भरत असल्याचे दिसून आले त्यावेळी आरोपींना पोलीस असल्याची चाहूल लागतात जेसीबी व ट्रॅक्टर घेऊन पळून गेले तर एक वाळू ने भरलेला सुमारे चार लाख रुपये चा ( MH १० CR २९६०) आयशर टेम्पो सह एकाच जागीच पकडून ताब्यात घेतले टेम्पोच्या पाठीमागे हौदामध्ये  १४ हजार रुपये अंदाजे दोन ब्रास वाळू मिळल्या भरल्याचे दिसून आले. यावेळेस पोलिसांनी पळून नेलेल्या जेसीबी सह ट्रॅक्टरचा शोध घेतला असता ती दोन्ही वाहने मिळून नाही आली.



मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌

                      मोहसीन इसाक खान.  

                        (८६०५१७१९१७).

                      रोहन हनुमंत हिवराळे.

                       ‌ ( ८६६८६१००५०).


Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !