विजेचा शॉक लागून लहान भावाचा मृत्यू अंत्यसंस्कार वेळी जळत्या चितेत मोठ्या भावाने मारली उडी !
विजेचा शॉक लागून लहान भावाचा मृत्यू अंत्यसंस्कार वेळी जळत्या चितेत मोठ्या भावाने मारली उडी !
सांगोला (प्रतिनिधी )
अत्याधुनिक आणि स्पर्धेच्या युगात सख्खा भाऊ पक्का वैरी अशा गोष्टी अनेकदा ऐकायला भेटतात परंतु खिलारवाडी येथील धनाजी बागल यांना विजेचा शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करताना भावाच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने भावाने जळत्या चितेत उडी मारल्याची घटना घडत आहे .दरम्यान उपस्थित नागरिकांनी सावरण्याचा प्रयत्न केला दरम्यान या दोन भावांची एकमेकान बद्दलचे प्रेम आणि आदर बघून निश्चितपणे अनेकांचे डोळे पाणवले एवढे मात्र नक्की.
दामोदर बापू बागल विकास सोसायटी खिलारवाडी चे विद्यमान संचालक व शिवसेना शाखाप्रमुख यांचे चिरंजीव धनाजी दामोदर बागल व २८ यांचे मंगळवारी रात्री बाराच्या दरम्यान स्वतःच्या विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेला असता शॉर्टसर्किटमुळे करंट लागून जागेवर मृत्यू झाला धनाजी हा पहाटेपर्यंत घरी आला नाही म्हणून त्यांचा मोठा भाऊ बालाजी विहिरीवर गेला तर त्याला त्याच्या भाऊ मृत अवस्थेत दिसला सदर बातमी वाऱ्यासारखे गावातून पसरली धनाजीचा स्वभाव हा मनमिळावू होता त्याच्या मैत्रीच्या जाळी विशाल होते गेल्या पाच वर्षे त्याचे लग्न झाले होते धनाजीच्या मृत्यूने पंचक्रोशीत हळूहळू व्यक्त होत आहे धनाजीचा मृत्यूचा आघात सहन न झाल्याने त्याच्या थोरल्या भावाने बालाजीने अक्षरशः चितेत उडीद घेण्याचा प्रयत्न केला त्याला लगेच जनसमुदायाने सावरले त्याला किरकोळ भाजले गेले हे दृश्य पाहून सर्वांचे डोळे पाणावले याबाबत सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाले अधिक माहिती अशी की खिलारवाडी येथे शिंदे वस्ती कॅनल शेजारी शेतात विजेचा शॉक लागल्याने धनाजी बागल यांना उपचार करता सांगोला ग्रामीण रुग्णालय ते दाखल करण्यात आले होते दरम्यान उपचारापूर्वी ते मयत झाली असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगोला ग्रामीण रुग्णालय यांनी पोलिसात खबर दिली आहे पुढील तपास सांगोला पोलीस करत आहे.
मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment