धाराशिव पोलीस ठाण्यामध्ये तीन व्यक्तींवर गुन्हा दाखल !

 धाराशिव -

                     शहरातील सरकारी दवाखाना परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन तरुणांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी फळीने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे .ही घटना (२६) एप्रिल रोजी पहाटे (०५:००) वाजण्याच्या सुमारास घडली याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शहबाज खादर तांबोळी वय २५ वर्ष रा देशपांडे स्टॅन्ड झोरे गल्ली धाराशिव हे त्यांचे मित्र खलील शफिक सौदागर आणि सज्जत रफीक शेख यांच्यासोबत सरकारी दवाखाना परिसरात असताना ही घटना घडली. आरोपी आयान मुन्ना कुरेशी रा तेरणा कॉलेज जवळ धाराशिव सोहेल इजियास कुरेशी आणि फैजोद्दीन इब्राहिम कुरेशी दोघे रा मिली कॉलनी धाराशिव यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून, फिर्यादी शहबाज व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ केली त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी फळेने मारहाण करून जखमी केलेआणि जिवे मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर शहबाज तांबोळी यांनी २७ एप्रिल रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी आयान कुरेशी सोहेल कुरेशी आणि फैजोद्दीन कुरेशी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११७ (२) सार्वजनिक शांततेचा अभंग करणे चिथावणी देणे,११५(२)स्वच्छेने दुखापत करणे ३५२ गुन्हा करण्याच्या उद्देशाने जमाव जमवणे ३५१ (२) गुन्हेगारी धमकी आणि ३ (५) सामान्य उद्देशाने अनेक व्यक्तींनी केलेली कृती अन्वये पुन्हा नोंदवला आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.




मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌

                      मोहसीन इसाक खान.  

                        (८६०५१७१९१७).

                      रोहन हनुमंत हिवराळे.

                       ‌ ( ८६६८६१००५०)


Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !