शासकीय गोदामातून वाळू माफी यांनी वाहने पळवली !

शासकीय गोदामातून वाळूमाफीया यांनी वाहने पळवली !

सांगोला (प्रतिनिधी)

सांगोला शासकीय गोदाम येथील प्रकार कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी. 

कोरडा नदीतून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करताना महसूल प्रशासनाने पकडून जप्त केलेल्या वाहनांपैकी तिघांनी मिळून संगणमताने दंड न भरण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टर व टेम्पो पळवून नेला तसेच त्या ठिकाणी लावलेल्या इतर वाहनांचे टायर काढून वाहनांच्या काचा फोडून शोची तोडफोड करून नुकसान केले आहे. 

ही घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास शासकीय गोदाम सांगोला या ठिकाणी उघडकीस आली आहे याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी गौरव शशिकांत कुंभार यांनी फिर्यादी दिली असून पोलिसांनी ते का विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तहसीलदार संतोष कनसे यांच्या आदेशान्वये २४ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता सांगोला तालुक्यातील मान कोरडा नदीपात्रातून चोरून वाळूचे वाहतूक करताना महसूल प्रशासनाने पकडून जप्त केलेली १६ वाहने दंडात्मक कारवाई करून सांगोला तहसील कार्यालयात लावली होती दरम्यान तहसीलदार संतोष कणसे यांच्या आदेशान्वये २४ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता सदरची वाळू चोरीतील सोळा वाहने शासकीय धान्य गोदाम परिसरात हलवली होती २५ एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सदर वाहनांची तपासणी केली असता वाहने शासकीय गोदामात सुरक्षित होती त्यानंतर त्याच दिवशी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी गौरव कुंभार तलाठी कुमार रवी राजवाडे मंडळ अधिकारी महेश जाधव तलाठी श्रीरंग लोखंडे यांनी लावलेली वाहने पाहण्याकरिता गेले त्यावेळी सदर ठिकाणी काही लोक गोदामाच्या जवळ फिरताना दिसल्यावर त्यांना तेथून जाण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी २६ एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारेच फिर्यादी कार्यालयात असताना गोदामाचे अव्वल कारकून नितीन जाधव यांनी फोनवरून तुम्ही लावलेल्या वाहनापैकी एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व एक बिगर नंबरचा टेम्पो लावलेल्या ठिकाणी नाहीत ते रात्री कोणीतरी येऊन गेल्याचे सांगितले.

गोदाम परिसरात लावलेली वाहने ही गोदाम विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संगणमतानेच नेल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी त्यांना मदत करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी जनतेमधून केली जात आहे. 




    मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌

                      मोहसीन इसाक खान.  

                        (८६०५१७१९१७).

                      रोहन हनुमंत हिवराळे.

                       ‌ ( ८६६८६१००५०).

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !