सोलापूर शहरातील प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली !

 सोलापूर (प्रतिनिधी )

                सोलापूर शहरातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली असून शहरातील प्रसिद्ध मेंदू विकार (न्यूरो सर्जन )तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर येत आहे या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

             डॉक्टर शिरीष वळसंगकर हे सोलापूर आणि महाराष्ट्रासाठी एक भूषण होते ,मेंदू आणि मणक्यातील गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया करत असत ,त्यांच्या या कार्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले होते ,त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची प्रतीक्षा यादी नेहमीच मोठी असायची हे त्यांच्यावरील लोकांचे विश्वासाचे आणि त्यांच्या कौशल्याचे प्रतीक होते वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी मिळवलेली उंची थक्क करणारे होती .इतकं यश प्रसिद्धी प्रतिष्ठा आणि आर्थिक संपन्नता असूनही एका क्षणात त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत त्यांचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला,या घटनेमागे नेमकं काय कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

               शुक्रवार दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना त्यांच्या सात रस्ता परिसरातील सोनामाता शाळेच्या शेजारी असलेल्या बंगल्यात घडली असल्याची माहिती समोर येत आहे सदर बाजार पोलीस ठाणे यांनी सुचवलेले आहे.

                      अशी माहिती मिळत आहे की डॉक्टर       वळसंगकर यांनी आपल्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली त्यानंतर त्याच अवस्थेत कुटुंबीयांनी तातडीने त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल असलेल्या मोदी स्मशानभूमी जवळील वळसंगकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले मात्र त्यांचे दुःखद निधन झाल्याचे माहिती मिळत आहे .










मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌

                      मोहसीन इसाक खान.  

                         (८६०५१७१९१७).

                      रोहन हनुमंत हिवराळे.

                        ‌ ( ८६६८६१००५०)

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !