वाळू तस्करी मेटकरी एका वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध !
वाळू तस्करी मेटकरी एका वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध !
पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैधपणे वाळू उपसा करून ती बेकायदेशीरपणे विक्री व्यवसाय करणारा वाळू तस्कर तसेच शरीर विषयी गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार विकी उर्फ विकास मधुकर मेटकरी राहणार देवकते मळा पंढरपूर हा अवैधरित्या वाळू चोरी करणे ती विक्री करणे सोयीचे व्हावे याकरिता दहशत माजवन्या करिता अवैध वाळूचे कारणावरून जीव घेणे हल्ले करणे तसेच पंढरपूर शहर व पंढरपूर शहरालगतच्या परिसरातील लोकांना दमदाटी मारहाण करून गौण खनिज वाळू चोरी करणे असे गुन्हे करण्याची त्यास सवय होती.
भारतीय न्याय संहिता २०२३ मधील प्रकरण सहा व १७ मधील अपराधी स्वरूपाचे कृत्य असून सदरची कृत्य करण्याची त्याची सवय जडली होती एक धोकादायक व्यक्ती म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केले होते. त्याचे विरुद्ध अनेक वेळा अवैध वाळू व्यवसायाशी संबंधित तसेच शरीराविषयी गुन्हे दाखल होऊन त्यामध्ये अटक करण्यात आली होती परंतु तो सदर गुन्ह्यात जामीन मिळवून अवैध वाळू व्यवसाय अव्यहातपणे सुरूच होता.
त्यानंतरही त्याच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता तो कायद्याला जुमानत नव्हता म्हणून सराईत वाळू तस्कर गुन्हेगारी विकी उर्फ विकास मधुकर मेटकरी याच्याविरुद्ध वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टी व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती द्रकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारी व्यक्ती वाळूतस्कर त्याच्या विघातक कृत्यांना आळा घालने विषयी चा कायदा अन्वये स्थानबद्ध करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण यांच्यामार्फत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांना पाठविण्यात आला होता त्या अनुषंगाने स्थानबद्धतेचे कामकाज चालवून त्यांनी एम पी डी ए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची आदेश पारित केलेने त्याच ताब्यात घेऊन येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे एका वर्षाकरिता स्थानबद्ध करणेत आलेले असून पंढरपूर शहरातील वाळूतस्कर व शरीराविषयीचे गुन्हे करणारे व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे.
मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment