श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास चैत्र यात्रेत २ कोटी ५६ लाखांचे उत्पन्न !
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास चैत्र यात्रेत २ कोटी ५६ लाखांचे उत्पन्न !
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गोरगरीब दिन दुबळ्या पासून श्रीमंतांपर्यंत चैत्र यात्रा पोहोचण्यासाठी आलेल्या भाविक, वारकरी, भक्तानी श्री च्या चरणा जवळ तसेच विविध प्रकारे चैत्र यात्रेत लाखो रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण आहेत.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्त निवास, पूजा, फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमांतून सुमारे २ कोटी ५६ लाख रुपये उत्पन्न वारकरी, भाविक, भक्तांनाकडून मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे.
चैत्री यात्रे साठी राज्याचा कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत वारी पोहोच करण्यासाठी आले होते. दरम्यान चैत्र शुद्ध १ ( दिनांक ३० मार्च) ते चैत्र शुद्ध १५ ( दिनांक १२ एप्रिल) या कालावधीत भाविकांनी श्रीच्या चरनाजवळ २५,५९, ०९२ /- रुपये अर्पण केले. तर ६३,९९,७७९/- रुपये देणगी स्वरुपात प्राप्त झाले. २६,२१,०००/- रुपये लाडू प्रसाद विक्रीतून मिळाले. ३४,३४,७०८ /- रुपये भक्तनिवास तर २९,२२,१०० /- पूजेच्या माध्यमातून मिळाले. ६४,८५,२०४ /- रुपये दान पेटीतून. १६,४७७४ रुपये सोने चांदी अर्पण तसेच फोटो महा वस्त्रे शेणखत, गोमूत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यामातून १०,६८३९८ रुपये इतके प्राप्त झाले आहे.
मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment