अदिबा अनमने केले वडिलांच्या कष्टाचे सोने देशात १४२ वी रँक !

 अदिबा अनमने केले वडिलांच्या कष्टाचे सोने देशात १४२ वी रँक !

वडील ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकत असताना अदिबा अनम अत्यंत कठीण परिस्थितीत युपीएससी परीक्षेचा अभ्यास करत होती .सतत तीन प्रयत्नानंतर पदरी अपयश पडले मात्र तरीही निर्धारण सोडता अदीबा अनमने पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. अखेर तिला यश मिळाले तिच्या यशामुळे वडिलांच्याही कष्टाचे सोने झाले आहे. अदिबा अनम हिने यूपीएससी परीक्षेत देशात १४२ वी रँक प्राप्त केली आहे. याचबरोबर राज्यातून पहिली मुस्लिम महिला आय ए एस बनण्याचा बहुमान तिला मिळाला आहे. पांढरकवडा मार्गावरील कोहिनूर सोसायटीत राहणाऱ्या अदिबा अनम अश्फाक अहेमद हिने बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्धार केला होता. २०२० मध्ये बीएससी झाल्यावर आदीबा ने थेट दिल्ली गाठली तेथे आयएएस प्रशिक्षण संस्था आणि नंतर जामीया इस्लामी युनिव्हर्सिटी तिने अभ्यास केला, व वडिलांच्या कष्टाच्या सोने केले. 

वडिलांनी ऑटो चालवून तिच्या शिक्षणाला बळ दिले. प्रॉपर्टी डेली व्यवसायात शिरल्यानंतर आता कुठे कुटुंबाला चांगले दिवस आले आहेत अशा वेळी वडिलांना निराश करायचं नाही असा त्याचा निर्धार होता. 

आदिबाचीआई गृहिणी आहे तर अनिक व अवेज हे दोन भाऊ शिक्षण घेत आहेत निकाल जाहीर होताच घरी तिचे अभिनंदन करण्यासाठी गर्दी झाली यावेळी आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.




      मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌

                      मोहसीन इसाक खान.  

                        (८६०५१७१९१७).

                      रोहन हनुमंत हिवराळे.

                       ‌ ( ८६६८६१००५०)


Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !