परिविक्षाधीन आय.पी.एस.अंजना कृष्णा व्ही.एस.मॅडम यांची अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून एकूण २५,२३७६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत !

 परिविक्षाधीन आय.पी.एस.अंजना कृष्णा व्ही.एस.मॅडम यांची अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून एकूण २५,२३७६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

दिनांक १२/०४/ २०२५ रोजी माननीय परिविक्षाधीन आय.पी.एस अंजना कृष्णा व्ही.एस.प्रभारी अधिकारी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे यांना बेकायदेशीरपणे अवैध गुटखा वाहतूक करणारे वाहनाची माहिती मिळाल्याने,त्याप्रमाणे ग्रामीण पोलीस ठाणे येथे पथक तयार करून खाणा करून सदर गाडीचा पिराची कुरोली तालुका पंढरपूर येथून पाठलाग करत टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील परिते गावाजवळ हॉटेल शेळके वाडा येथे सदर वाहन पकडले.

                        सदर चालकास वाहनाची व वाहनातील मालाबाबत चौकशी केली असता सदर वाहनात सुगंधी गुटखा सुपारी व सुगंधी तंबाखू असलेले बाबत सांगितलं सदर वाहन चालक नामे संतोष मोहोन नकाते राहणार वासूद अकोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर त्यांचे सोबत असलेला इसम नामे अनिल सुखदेव बेहरे राहणार बेहरे चिंचोली तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे यांच्याविरुद्ध कारवाई करून एक बुलेरो पिकप त्याचा आरटीओ नंबर एम एच ४५ ए एफ २३०७ व त्यातील सुगंधी गुटखा सुपारी व तंबाखू असा एकूण २५ २३ ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे व संबंधित इसम यांच्यावर टेंभुर्णी  पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,सो.माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सो.माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर श्री अर्जुन भोसले सो. यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा मॅडम प्रभारी अधिकारी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे पोसई वीरसेन पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अजित मिसाळ सुनील लोंढे यांनी केली आहे.






मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌

                      मोहसीन इसाक खान.  

                         (८६०५१७१९१७).

                      रोहन हनुमंत हिवराळे.

                        ‌ ( ८६६८६१००५०)


Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !