तहसीलदारच्या आदेशाला केराची टोपली !
तहसीलदारच्या आदेशाला केराची टोपली !
तुळजापूर तालुक्यातील सलगर महसूल मंडळ अंतर्गत असलेले मंडळ अधिकारी यांना कलम ८५ नुसार दिलेल्या तहसीलदार यांच्या आदेश मान्य असून संबंधित मंडळ अधिकारी जाणून-बुजून काहीतरी चिरीमिरीच्या उद्देशाने फेर फार मंजुरीसाठी दुर्लक्ष केले जात आहे का ? मंडळ अधिकाऱ्याच्या खादाड ? वृत्तीला शेतकरी वैतागल्याचे दिसून येत आहे.
सलगर महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या महसुली प्रकरणे कायदेशीर रित्या आवश्यक कागदपत्रे फेर मंजूर साठी गेल्यानंतर ही फेर मंजुरीसाठी मंडळ अधिकारी काहीतरी चहा पाणी मिळावे या हेतूने फेर मंजूर करण्यात तयार नाहीत.अशी गावागावात त्रस्त शेतकऱ्यांकडून चर्चा होताना दिसत आहे.तुळजापूर तालुक्यातील वडगाव तसेच किलज येथील शेतकरी सुरेश किसन सारणे यांनी सलगर मंडळ अधिकारी यांना अर्ज व अर्ज सोबत माननीय तहसीलदार तहसील कार्यालय तुळजापूर यांचे आदेश जा. क्र.२०२४ महसूल कलम ८५ कावी-१४४९ दिनांक २४ मार्च २०२५ प्रमाणे आदेश इत्यादी मंडळ कार्यालयात जमा करूनही मंडळ अधिकारी जाणून बुजून फेरफार मंजूर करण्यास दिरंगाई करत आहेत व तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपीली दाखवत आहे. एकीकडे महाराष्ट्र शासन महसूल विभागातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी अनेक प्रकारच्या वल्लभ ना दररोज करतो परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र तालुक्यातील निर्माण झाले असून तलाठी व मंडळ अधिकारी टेबल खुर्च्या खालून पैसे घेतल्याशिवाय कुठलंही महसुली काम करण्यास तयार नसल्याचे चित्र सदर प्रकरणात स्पष्टपणे दिसून येत आहे .सदर प्रकरणात मंडळ अधिकारी यांची मग्रुरी इतकी वाढली आहे की थेट तहसीलदार साहेबांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम संबंधित मंडळी अधिकारी दिवसाढवळ्या करत असून तहसील कार्यालय तुळजापूर मात्र दरवेळेस प्रमाणे प्रेक्षकांच्या बघ्यांच्यी भूमिकेतून दिसून येत आहे. त्यामुळे आता शेतकरी संबंधित फेरफार मंजुर करण्यासाठी नेमका न्याय कोणाकडे मागायचा असा ज्वलंत प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून तुळजापूर तहसील कार्यालयाने संबंधित मंडळ अधिकारी यांना नोटीस काढून संबंधितावर कडक कारवाई करावी प्रलंबित असलेले फेर मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी संबंधी शेतकऱ्यातून होत आहे.
मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment