शासकीय कामात अडथळा व पोलिसांना शिवीगाळ दिल्याप्रकरणी एका व्यक्ती विरोधात तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !
तामळवाडी
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी शिवारात शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांना शिवीगाळ व धमकी दिल्या प्रकरणी एका व्यक्ती विरोधात तामलवाडी पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी संबंधित व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सी आर पी सी कलम १२६ अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी पोलिसांनी तुळजापूर तहसीलदाराकडे केली आहे.
याबाबत तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी.आर टेकाळे यांनी तुळजापूरच्या कार्यकारी दंडाधिकार्याकडे अहवाल सादर केला आहे. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल अतुल संपत जाधव वय २९ राहणार कोंबडे वाडी यांनी फिर्यादी दिली आहे की १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल जाधव हे राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर व चालक नितीन सरवदे यांच्यासह यमगरवाडी शिवारातील पाझर तलावाकडे जात होते .
यावेळी त्यांनी रस्ता अडवलेला दिसला चौकशी केली असता ,सोमनाथ जीवन वाघमोडे राहणारे यमगरवाडी यांनी हा रस्ता अडवल्याचे समजले. अधिकाऱ्यांनी वाघमोडे यांना फोनवरून विचारणे केली असता ,त्यांनी उलट तुम्ही "कोण विचारणारा ?हा रस्ता माझा आहे "असे म्हणायचे त्यानंतर घटनास्थळी येऊन त्यांनी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल जाधव व मिटकर यांना पुन्हा शिवीगाळ करत तुम्ही "मला काय करता बघतो ? "अशी धमकी दिली.
कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि धमकी दिल्याबद्दल सोमनाथ जीवन वाघमोडे यांच्याविरोधात तामलवाडी पोलीस ठाण्यात अदखलपत्र गुन्हा नोंदणी क्रमांक ३० /२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २११ (सार्वजनिक उपद्रव), ३५१ (हल्ला) ३५२ (१) (२) (गंभीरचितावणी शिवाय हल्ला किंवा फौजदारी पत्र बलप्रयोग) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकारे गावात ताण-तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे यामुळे सोमनाथ जीवन वाघमोडे यांच्याकडून सार्वजनिक शांतता अभंग पाहू नये यासाठी त्यांच्याकडून दीड महिन्याच्या मदतीसाठी जातमोचलका जमीनबांध पत्र द्यावे आणि CRPC कलम १२६ व १३५ तीन अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी विनंती पोलिसांनी केली आहे. यासाठी वाघमारे यांना समस्त बजावण्याची मागणी ही करण्यात आली आहे .
उमाकांत मिटकर हे राज्य पोलीस तक्रारी प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य असताना, तसेच त्यांच्या अंगरक्षक पोलीस असताना तमलवाडी पोलिसांनी हे प्रकरण कोर्टात न पाठवता तहसीलदार यांच्या दरबारात पाठवली आहे तसेच शासकीय कामात अडथळा हे कलम लावले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment