Posts

Showing posts from May, 2025

पंढरपूर तालुका पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण कडील कारवाई !

Image
  पंढरपूर तालुका पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण कडील कारवाई !        पंढरपूर  तालुका पोलीस ठाणे कडून एम पी डी ए महाराष्ट्र झोपडपट्टी दादा औषधी द्रव्य विषय गुन्हेगार धोकादायक व्यक्ती वाळू तस्कर यांच्या कृत्यांना प्रतिबंध अधिनियम १९८१  कलम ३ कायदया अर्तगत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हदीतील वाळु माफीया व सराईत गुन्हेगार  इसम अजिंक्य उर्फ ​​बबलु चंद्रकांत रोकडे वय २८ वर्षे रा. ओझेवाडी. पंढरपूर यास एम पी डी ए कायदयाअर्तगत स्थानबध्द करून येरवाडा जेल येथे रवाना केले.        पंढरपुर तालुका पोलीस ठाणे कडून एम पी डी ए कायदयाअर्तगत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हददीतील वाळु माफीया व सराईत गुन्हेगार इसम नामे अजिंक्य उर्फ बबलु चंद्रकांत रोकडे वय २८ वर्षे रा. ओझेवाडी ता पंढरपुर जि सोलापुर हा पंढरपुर तालुका पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात वास्तव्यास आहे. अजिंक्य उर्फ बबलु चंद्रकांत रोकडे यास लोक "बबलु" या नावाने ओळखतात. तो त्याचे साथीदारासह पंढरपुर तालुका व मंगळवेढा शहरालगतच्या परीसरातील लोकांना दमदाटी करणे, मारहाण करणे, अवैधरित्या वाळु उत्खनन करून त्याची ...

सोलापूर जिल्हा परिषदेत पाच वर्षाहून अधिक काळ एकाच टेबलाला चिटकून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या 30 व 31 मे रोजी होणार आहेत.

Image
 सोलापूर, प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेत पाच वर्षाहून अधिक काळ एकाच टेबलाला चिटकून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या 30 व 31 मे रोजी होणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या आदेशानुसार प्रशासन विभागाने बदल्याचे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत बदल्यांचा अंतिम टप्पा आता सुरू होत आहे. आरोग्य व ग्रामपंचायत आणि पंचायत समित्या कडील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. विनंती व प्रशासकीय बदल्यानंतर पाच वर्षाहून अधिक काळ एकाच ठिकाणी असलेल्यानाही आता बदलले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांमुळे अनेकांना पंचायत समितीकडून मुख्यालयात येता येत नाही. आरोग्य विभाग बदल्या करताना मुख्यालयाबरोबरच दक्षिण व उत्तर सोलापूर पंचायत समिती मधील रिक्त जागा दाखवत नाही अशा कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे इतर तालुक्यात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयाबरोबरच या दोन तालुक्यात संधी मिळत नाही. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पाच वर्षाहून अधिक काळ काम केलेल्या कर्मचाऱ्यांना ब...

अपुर्‍या जागेसह दुरवस्थेत मोहोळ बसस्थानक नुतनीकरणासाठी आ. राजू खरेंची परिवहन मंत्र्यांकडे दहा कोटींची मागणी

Image
मोहोळ, प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्युज नेटवर्क पोखरापूर : मोहोळ हे अंत्यत गजबजलेले बसस्थानक असूनही सदर ठिकाणी मागील 40 वर्षापासून कुठल्याही सुविधा नाहीत. तरी एस.टी. महामंडळाच्या निधी अंतर्गत नवीन सुसज्य असे एस.टी. बसस्थानक बांधकामास 10 कोटी निधी मंजूर करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे आमदार राजू खरे यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोहोळ बसस्थानकात सुरू असलेल्या पावसामूळेे तळे साचले आहे.सोयीसुविधांच्या अभावामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. पावसाचे साचलेले पाणी अंगावर उडू नये म्हणून प्रवासी धावपळ करताना दिसतात तर दुसरीकडे एसटी बस चालकांची पाण्याने भरलेला खड्डा चुकवण्याची कसरत सुरू असते. मोहोळ-पंढरपूर - आळंदी पालखी मार्ग व सोलापूर - पुणे असे दोन राष्ट्रीय महामार्ग बसस्थानकाच्या दोन्ही बाजूंनी गेल्यामूळे मोहोळ शहरातील बसस्थानक अत्यंत अपुर्‍या जागेत राहिले असून ते प्रशस्त व्हावे, अशी प्रवाशांमधून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. मोहोळ बसस्थानकातून पुणे, कोल्हापूर, अक्कलकोट, दक्षिण काशी पंढरपूरसाठी सातत्याने भाविकांची वर्दळ असते....

श्री विठ्ठल रुक्मिणी ऑनलाइन दर्शन पास बुकींगच्या संख्येत व वेळेत वाढ

Image
  पंढरपूर शहर प्रतिनिधी श्री विठ्ठल रुक्मिणी ऑनलाइन दर्शन पास बुकींगच्या संख्येत व वेळेत वाढ *भाविकांनी ऑनलाईन दर्शनपास बुकींग सुविधेचा लाभ घेण्याचे मंदिर समितीचे आवाहन,     पंढरपूर श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना ऑनलाईन पध्दतीने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समिती मार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरून निशुल्क दर्शन पास बुकिंगची सुविधा भाविक भक्तांसाठी उपलब्ध असून, जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे सुखकर पददर्शन घेता यावे यासाठी ऑनलाइन दर्शन पास बुकींग संख्येत व वेळेत वाढ करण्यात आली असून या सुविधेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर च्या अधिकृत संकेतस्थळावरून दर्शन पास बुकिंगची सुविधा भाविक भक्तांसाठी उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करून, भक्तांना त्यांच्या इच्छित दिवशी आणि वेळेस मंदिरात पदस्पर्शदर्शन घेता येते, ज्यामुळे रांगेत जास्त वेळ उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. सण, यात्रा, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून स...

शेतजमिनीच्या मोजणीसाठी लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक रंगेहाथ अडकला!

Image
  शेतजमिनीच्या मोजणीची कायमखुना करण्यासाठी 3000 रुपयांची लाच मागणाऱ्या व नंतर तडजोडीनंतर 2000 रुपये लाच स्वीकारणाऱ्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय वाशी येथील आवक-जावक लिपिकाला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तक्रारदाराने आपल्या आईच्या नावावरील गट नंबर 444 मधील शेतजमिनीच्या मोजणीसाठी संबंधित कार्यालयात अर्ज दाखल केला होता. यावरून दिनांक 7 मे 2025 रोजी मोजणी करण्यात आली होती. मात्र, हद्द कायम खुणा करण्यासाठी लिपिक दिगंबर मारुती ढोले (वय 45), रा. वाशी, मूळ रा. हदगाव, ता. पाथरी, जि. परभणी, यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. तक्रारीची पडताळणी दिनांक 26 मे रोजी करण्यात आली. पंचासमक्ष ढोले यांनी लाच मागणी करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, आज 27 मे रोजी सापळा कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान ढोले यांनी तक्रारदाराकडून पंचासमक्ष 2000 रुपये स्वीकारले आणि त्याच क्षणी त्यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. ढोले यांच्या अंगझडतीत 2000 रुपयांची लाच रक्कम व एक ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू असून, त्यांच्यावर लाच...

बंद असलेली शिर्डी पंढरपूर रेल्वे पुन्हा सुरू करा

 पंढरपूर प्रतिनिधी बंद असलेली शिर्डी पंढरपूर रेल्वे पुन्हा सुरू करा वारकऱ्यांची मागणी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या साईबाबांची शिर्डी आणि वारकऱ्यांचे आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग विठोबा या दोन्ही श्रद्धा स्थानांना जोडणारी शिर्डी मुंबई पंढरपूर अशी जलद गती पॅसेंजर रेल्वे गाडी पाच वर्षांपूर्वी सुरू होती मात्र ती आता शिर्डी मुंबई पर्यंतच चालवली जाते त्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून त्यांनी ही रेल्वे सेवा शिर्डी ते पंढरपूर पर्यंत न्यावी अशी मागणी रेल्वे प्रवासी वारकऱ्यांनी संबंधित रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एका निवेदन द्वारा केली आहे अवघ्या (110) रुपयात शिर्डी ते पंढरपूर असा प्रवास वारकऱ्यांचा होत मात्र पाच वर्षांपासून ही रेल्वे सेवा खंडित करण्यात आले आहे सदर शिर्डी पंढरपूर ही रेल्वे सकाळी पाच वाजता असायची साडेबारापर्यंत पंढरपूरला पोहोचायची मात्र ती आता बंद आहे त्यामुळे अनेक वारकऱ्यांसह भाविकांमध्ये अस्वस्थता आहे पंढरीचा पांडुरंग अनेक वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे तर पंढरपुरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान साईबाबांची शिर्डी आहे या दोन धार्मिक स्थळावरी...

पंढरपूर तालुक्यात ॲक्युपंक्चर मेडीकल कॉलेजला, महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची मान्यता.,

पंढरपूर तालुक्यात ॲक्युपंक्चर  मेडीकल कॉलेजला, महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची मान्यता., 12 वी नंतर वैद्यकीय व्यवसायात करीअर करण्याची विद्यार्थ्यांना संधी.- डॉ.सुधीर शिनगारे पंढरपूर - शिवकमल कॉलेज ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सेस,भंडीशेगांव,ता.पंढरपूर या कॉलेजला महाराष्ट्र  ॲक्युपंक्चर मुंबई, व वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाकडून डि.ए.टी. कोर्स करीता मान्यता प्रदान केल्याने पश्चिम महाराष्ट्रातील 12 वी पास विद्यार्थ्याकरींता मेडीकल क्षेत्रात करीअर करण्याची संधी मिळाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधीर शिनगारे यांनी दिली.             भंडीशेगांव ता. पंढरपूर येथील शिवस्वराज्य मेडीकल फाउंडेशन संचलित, शिवकमल कॉलेज ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सेस कॉलेजमध्ये डिप्लोमा इन ॲक्युपंक्चर थेरेपी हा दोन वर्ष अभ्यासक्रमाचा नवीन ॲक्युपंक्चर चिकीत्सा पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे.  या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता 50 विद्यार्थी प्रवेश क्षमता असणार आहे. या अभ्यासक्रमासाठी 12 वी पास कोणताही शाखेचे विद्यार्थी प्रवेश...

पाण्याचे वितरणाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली !

Image
पाण्याचे वितरणाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली  ! मुंबईत सोलापूरचे पालकमंत्री ना.श्री.जयकुमार गोरे साहेब, व जलसंपदा मंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली . या बैठकीत विशेष उपस्थिती मा.खासदार  रणजितसिंह नाईक निंबाळकर, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे, सांगोला विधानसभा आमदार बाबासाहेब देशमुख, आ.नारायण आबा पाटील,आ.उत्तमराव जानकर माढ्याचे आमदार अभिजीत आबा पाटील हे सर्व उपस्थित होते. सिना माढा उपसा सिंचन योजनेचे फुटवॉल्व्ह उंची वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार असून त्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दिले व उजनी धरणातून पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी नवीन बंधारे, सध्याचे बंधारे दुरुस्ती करण्यात बाबत पुढील वर्षी पाण्याचे वितरणाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली . लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क                        मोहसीन इसाक खान.                         ...

नांदगाव येथे भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रम पार पडला !

Image
  नांदगाव येथे भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रम पार पडला ! नांदगाव (ता. तुळजापूर)             येथे.नवीन 33 के.व्ही. क्षमतेच्या वीज उपकेंद्राच्या (सबस्टेशन) भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम खासदार ओमराजे निंबाळकर.यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रकल्पामुळे नांदगावसह परिसरातील शेती, उद्योगधंदे व घरगुती वीजपुरवठा अधिक सक्षम व नियमित होणार असून, ही एक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा ठरणार आहे.  या कार्यक्रमाला खासदार ओमराजे निंबाळकर,कमलाकर चव्हाण, अशोक भाऊ पाटील, गजेंद्र पाटील, प्रकाश चव्हाण, कृष्णाथ मोरे, सूर्यकांत अरबळे, परमेश्वर चिनगुंडे, गिरीश नवगिरे, राजेंद्र जाधव, सोमनाथ परशेट्टी, बाळू मारेकर आणि राजू मोर यांची प्रमुख उपस्थिती होती.          या सबस्टेशनच्या मंजुरीसाठी शिवसेना पक्षाचे सूर्यकांत अरबळे यांनी विशेष प्रयत्न केले. कोरोनासारख्या कठीण परिस्थितीतही त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत हा प्रकल्प मंजूर करून घेतला. त्यांची जिद्द, चिकाटी आणि लोकहितासाठीची तळमळ उल्लेखनीय आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील वारंवार होणाऱ्या वी...

तुळजापूर शहरात किरकोळ कारणावरून मारहाण तिघांन विरुद्ध गुन्हा दाखल !

Image
  तुळजापूर शहरात किरकोळ कारणावरून मारहाण तिघांन विरुद्ध गुन्हा दाखल  !    तुळजापूर शहरात किरकोळ कारणावरून एकास लाथाबुक्यांनी आणि काठी, पाईपाने मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम लाल पवार (वय १८, रा. धाकट तुळजापूर) असे जखमी युवकाचे नाव असून, त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक १६ मे २०२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मलबा कॉर्नरजवळ दुर्वा वडापाव दुकानासमोर त्याच्यावर बप्पा रुपनर, पिंटू रुपनर आणि एका इतर इसमाने केवळ चुळ भरल्याचे पाणी अंगावर पडल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि काठी, पिवळा पाईपाने मारहाण केली. यामध्ये प्रेम पवार हा गंभीर जखमी झाला असून, आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेची तक्रार २० मे रोजी दाखल करण्यात आली असून, त्यावरून तुळजापूर पोलिसांनी भा.दं.वि. कलम 118(1), 115(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क         ...

रितु खोकर यांची धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली !

Image
रितु खोकर यांची धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली !   महाराष्ट्र शासनाने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या केल्या असून, या बदल्यांतर्गत रितु खोकर (भा.पो.से.) यांची धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी सांगली येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. धाराशिवचे विद्यमान पोलीस अधीक्षक संजय वाघ जाधव यांची या बदल्यांमध्ये बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी आता रितु खोकर या जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेची धुरा सांभाळणार आहेत. गृह विभागाच्या ए.डी.-10010/25/2025/पोल-1 या क्रमांकाच्या आदेशानुसार ही बदली जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अधिक चांगली करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने एकाचवेळी २० पेक्षा अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यासाठी रितु खोकर यांची नियुक्ती हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क                        म...

घाटकोपर येथे एका मुलीला वाचवण्याचा प्रयत्नात तरुणाने गमावला जीव !.

Image
  घाटकोपर येथे एका मुलीला वाचवण्याचा प्रयत्नात तरुणाने गमावला जीव ! पोलिसांच्या अहवालानुसार, मुंबईतील घाटकोपर येथे नाल्यात पडलेल्या एका अल्पवयीन मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करताना २७ वर्षीय गवंडी शहजाद शेख याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला . सोनाली बंजारा नावाची ही मुलगी नाल्याजवळ खेळत असताना ती घसरून पडली. शेख आणि त्याचा दुसरा शेजारी संदीप सुतार यांनी तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि तिला वाचवण्यासाठी नाल्यात उडी मारली. मुलीला वाचवण्यात त्यांना यश आले तेव्हा शेखचा पाय गाळात अडकला आणि तो बुडाला. अग्निशमन दल आणि पोलिसांनी नंतर शेखचा मृतदेह बाहेर काढला आणि त्याला रुग्णालयात मृत घोषित केले. अपघाती मृत्यूचा अहवाल दाखल करण्यात आला आणि शेखच्या पश्चात त्याची पत्नी आणि चार मुले आहेत . लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क                        मोहसीन इसाक खान.                           (८६०५१७१९१७).             ...

अवैध अतिक्रमण व जीवे मारण्याची धमकी : धाराशिवमध्ये गुन्हा नोंद

 धाराशिव – शहरातील उस्मानपुरा भागात एक गंभीर प्रकार उघडकीस आला असून, सरफराज अहमद जमील अहमद मोमीन (वय ३९, रा. मिल्ली कॉलनी, धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मालकीच्या जमिनीस अनधिकृतपणे अतिक्रमण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे तक्रारीनुसार, दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी अंदाजे ७:३० वाजता सांजा रोड, उस्मानपूराजवळ, सर्वे नं. २१४/२(पे) या जमिनीवर आरोपी नामे सुनिल वाघमारे, लता वाघमारे व त्यांच्यासोबत असलेल्या अजून एका इसमाने अनधिकृतपणे अतिक्रमण करत सरफराज मोमीन यांना धमकावले. "जमिनीतून मागे हटले नाही तर जीवे मारू" अशी उघड धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असली, तरी सरफराज मोमीन यांनी २० मे २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलीसांनी भा.दं.वि. कलम ३२९(२), ३५१(२)(३), व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, जमिनीवरील अतिक्रमणाबाबत संबंधित महसूल यंत्रणेसही याची कल्पना देण्यात आली असून, कायदेशीर प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क...

पंढरपूर जवळ असलेल्या लक्ष्मी - टाकळी येथील ग्रामदैवत असलेले लक्ष्मी यात्रेची आज सांगता झाली !

Image
  पंढरपूर जवळ असलेल्या लक्ष्मी - टाकळी येथील ग्रामदैवत असलेले लक्ष्मी यात्रेची आज सांगता झाली ! सलग 3 दिवस चालत असलेल्या लक्ष्मी टाकळी येतील यात्रेची सांगता मोठ्या थाटामाटात झाली पहिल्या दिवशी शिवे वरील देवीचे गावाच्या मंदिरात आगमन होते दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा गोड नैवेद्य लक्ष्मी ला दाखवला जातो तिसऱ्या दिवशी तिखट बोकडाचा नैवेद्य दाखवून पारंपरिक नृत्य,वेशभूषा, ऑर्केस्ट्रा हे गावातील लोकांना दाखवले जाते व मानाच्या ९ काठ्या बरोबरच मोठी मिरवणूक काढली जाते. लक्ष्मी टाकळी यात्रा कमिटी चे अध्यक्ष रामदास ढोणे  व गावातील जेष्ठ मंडळी आबासाहेब पवार,मा.उपसरपंच अनिल सोनवणे, शंकर धोत्रे,दाजी चंदनशिवे,सुरेश टिकोरे ,नंदकुमार वाघमारे, बापू देवकते ,औदुंबर पोतदार उपसरपंच. ग्रा.पं. सदस्य सागर सोनावणे,औदुंबर ढोणे,सागर कारंडे,महादेव पवार,सचिन वाळके,बापू उकरंडे,महेश धोत्रे, सारंग महामुनी,गणेश ढोणे,जयंत खंडागळे,सर्व गावकरी महिला मंडळ व नागरिक व ९ काठीचे मानकरी यांनी आंनदात शिवे वरील देवी ला परत मंदिरात पोहचवाण्याचा मान देण्यात आला. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क  ...

लक्ष्मी टाकळी येथील लक्ष्मी आई यात्रा मोठ्या उत्साहात साजरी !

Image
    पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील लक्ष्मी आईची यात्रा निमित्त सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी लक्ष्मी मातेचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी उपस्थित पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसाट, अश्विनी कंट्रक्शनचे संचालक आबासाहेब पवार, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य रामदासजी ढोणे,ग्रामपंचायत सदस्य दाजी चंदनशिवे, ग्रामपंचायत सदस्य सागर सोनवणे, ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अनिल सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे ग्रामपंचायत सदस्य सागर कारंडे, दादा धोत्रे व सर्व भाविक पदाधिकारी उपस्थित होते. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क                        मोहसीन इसाक खान.                           (८६०५१७१९१७).                       रोहन हनुमंत हिवराळे..              ...

सोलापूर अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीच्या परिसरात अग्नीचा तांडव !

Image
सोलापूर अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीच्या परिसरात अग्नीचा तांडव ! अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीच्या टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे त्याच घटनेनंतर अग्निशामक दलाचे अधिकारी व जवान असे तिघेजण भाजलेले आहेत. सोलापुरातील एका टॉवेल कारखान्याला रविवारी पाटील साडेचार च्या सुमारास आग लागली या आगीमध्ये सुरुवातीला तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि काहीजण अडकले असण्याचे सांगण्यात आले सायंकाळी चारच्या सुमारास कारखान्यातील कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले भडकलेली आग व धूर यांच्या मृत देहांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाला मोठी कसरत करावी लागली शेवटी भिंत फोडून मृतदेह बहर काढण्यात आले व शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले बारा तासानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलास यश आले. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क                        मोहसीन इसाक खान.                     ...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वार्षिक योजनेची बैठक पार पडली !

Image
  सर्व यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 चा 935 कोटीचा निधी वेळेत खर्च करावा.                                                                         -पालकमंत्री जयकुमार गोरे ज्या शासकीय यंत्रणांकडून निधी खर्च होणार नाही आशावर कडक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल  सर्वसाधारण योजनेअंतर्गत शासनाने 661 कोटीची मर्यादा घातली होती तर पालकमंत्री यांच्या प्रयत्नामुळे 121 कोटीचा अतिरिक्त निधी उपलब्ध झाला  जिल्हा वार्षिक योजना सन 2024- 25 या वर्षाच्या 857.84 कोटीच्या खर्चास नियोजन समितीने मान्यता  सोलापूर, दिनांक 16  :- जिल्हा वार्षिक योजना सन 2025 - 26 अंतर्गत सर्वसाधारण योजना 783 कोटी, अनुसुचित जाती उपयोजना 147 कोटी, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 5.44 कोटी असे एकूण 935.44 कोटींचा निधी मंजूर आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी माहे मार्च 2026 पूर्वी हा निधी खर्च करण्यासाठी काटेकोरपणे नियोज...

सोलापूर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली !

Image
  आज सोलापुर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मा.ना.जयकुमार गोरे साहेब यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी खासदार मा.धैर्यशील मोहिते-पाटील साहेब उपस्थित होते. यावेळी उजनी धरण पर्यटन आराखाडा, महूद सांगोला महामार्गावरील वाकी शिवणे येथील मंदीर महामार्गात बाधित होत आहे इतर ठीकाणी मंदीर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.विजेचे प्रश्न,सौर कृषीपंप,सांगोला तालुक्यातील ट्रामा सेंटर तसेच सांगोला शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा सुरु करणे यासंबधीच्या सुचना खासदार मा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मांडल्या. यावेळी जिल्ह्यातील खासदार,आमदार,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य,आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क                        मोहसीन इसाक खान.                           (८६०५१७१९१७).                       रोहन हनुमंत हिवराळे..     ...

पंढरपूर बस स्थानकात महिलेचे गंठण लंपास !

Image
  पंढरपूर बस स्थानकात महिलेचे गंठण लंपास ! पंढरपूर बस स्थानकात महिलेचे गंठण चोरीस एसटी बस मध्ये चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅमचे सोन्याचे गंठण चोरट्याने चोरून नेले याबाबत सारिका पंडित लोकरे वय ४५ रा अंबड ता.माढा या महिलेच्या फिर्यादीवरून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी चारच्या सुमारास सारिका लोकरे या पंढरपूर येथील नवीन बस स्थानकामध्ये आई बायडाबाई गायकवाड यांच्यासोबत टेंभुर्णी बस मध्ये चढत होत्या त्यावेळी गर्दीचा फायदा घेत सारिका यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये.किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरट्याने जबरदस्तीने चोरून नेले म्हणून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास  हवालदार गोडसे करीत आहे. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क                        मोहसीन इसाक खान.                           (८६०५१७१९१७).         ...

श्री. पुष्कराज खोत यांची UPSC परीक्षेत ३०४ रँक !

Image
  धाराशिव जिल्ह्यातील सटवाईवाडीचे माजी सरपंच मा. श्री. नानासाहेब खोत यांचे सुपुत्र, व पंढरपूरचे दादासाहेब धोत्रे यांचे मित्र मा. श्री. पुष्कराज खोत यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत UPSC परीक्षेत ३०४ रँक,घवघवीत यश संपादन करून IAS अधिकारी होण्याचा मान मिळवला. त्या निमित्त सत्कार करण्यात आला,सत्कार प्रसंगी उपस्थित मा.कुस्तीसम्राट अस्लम काझी,मा.श्री  आबासाहेब पवार ,अश्विनी कंट्रक्शन मालक लक्ष्मी टाकळी,श्री शंकर मामा धोत्रे, ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळी चे माजी उपसरपंच अनिल सोनवणे , सेवागिरी सप्लायर्स चे मालक औदुंबर पोतदार, माऊली देशमुख,गणेश चंदनशिवे,लक्ष्मी टाकळी चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर विनायक सोनवणे आदी उपस्थित होते. लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क                        मोहसीन इसाक खान.                           (८६०५१७१९१७).                       रोहन हनुमंत हि...

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना समाज व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार !

Image
  रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना समाज व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार ! रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे राज्यातील रस्त्यावर राहणाऱ्या हजारो बालकांना शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि नवजीवनाची संधी मिळणार असून ही योजना बालहक्कांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. राज्यातील २९ महानगरपालिकेत प्रत्येकी एक व मुंबई महानगरपालिकेमध्ये पुर्व व पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एक अशी एकूण ३१ फिरती पथके सुरू करण्यात येणार असून, आगामी काळात याची व्याप्ती राज्यात वाढविण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश रस्त्यावर राहणाऱ्या, एकल, अनाथ व दुर्लक्षित बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना शिक्षणाची गोडी लावणे, वैद्यकीय सेवा पुरवणे आणि त्यांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी आवश्यक त्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आहे. सुरुवातीला मिशन वात्सल्य अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे,...

सांगोला पोलीसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई !

Image
  सांगोला पोलीसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई  ! कोरडा नदी पात्रासह कासाळ ओढ्यातून विनापरवाना वाळू उपसा करून चोरून वाहतूक करताना पोलिसांनी २१००० रुपये किंमतीचा ३ ब्रास वाळू सह ८ लाख रुपये किंमतीचे तीन वाहने पकडून वाळू सह जप्त केली. ही कारवाई रविवारी दिनांक ११ आणि दिनांक १२ सोमवारी मे रोजी आलेगाव तालुका सांगोला येथील कोरडा नदी पात्र व महूद तालुका सांगोला येथील कासार ओढा सरकारी विहिरीच्या बाजूला बंधाऱ्यात केली.  याप्रकरणी करण शामराव जाधव रा. (टकले वस्ती महूद सांगोला). सुरज रामहरी धोत्रे रा.( चिकमहूद तालुका सांगोला) यांच्यासह अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला.  पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या आदेशान्वये पोलीस हवालदार असलम काझी, पोलीस हवालदार दत्ता वंजाळे आणि पोलीस कॉन्स्टेबल मारुती पांढरे हे सोमवारी सकाळी  ०६:३० च्या सुमारास पेट्रोलिंग करताना महूद येथे सरकारी विहिरीच्या बाजूला असणाऱ्या कासाळ ओढ्यातील बांधारालगत  दोन,चार चाकी वाहनांच्या साह्याने अवैधरित्या वाळूचा करत असलेली माहिती मिळाली त्या आधारे पोलिसांनी अचानक धाड टाकून पांढऱ्या रंगाचे बिगर नंबरचे चार ...

बोगस आदेश काढून नागरिकांना गंडवणारा हा इसम कोन?

Image
बोगस आदेश काढून नागरिकांना गंडवणारा हा इसम कोन ? पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर तहसील आवारात राहून अनेक कारनामे करणारा अवलिया अनेक दिवसांपासून कार्यरत आहे .कोर्टी येथील जमिनीचा परवानगीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांचे नावे बोगस आदेश बनवण्यात आला. सह दुय्यम निबंधक लिमसडे यांनी हा बोगस दस्त ही नोंदवला परंतु मंडळ अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला . प्रांत अधिकाऱ्यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश निबंधक लिमसडे यांना दिले आणि लिमसडे यांनी याबाबतचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात नोंदवला. शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेला गुन्ह्यात जमीन देणार, घेणार आणि ओळख देणार यांच्यावर आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे परंतु बोगस आदेश कोणी काढला हा मोठा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. सह दुय्यम निबंधक वर्ग दोन कार्यालयात यासारखे अनेक बोगस दस्त यापूर्वीही नोंदले गेले आहेत.  गुंठेवारी रद्द झाल्यापासून या प्रकाराचे आदेश काढून दस्त नोंदवण्यात आले आहे या सर्वच बोगस दस्ताची चौकशी होणार काय ? उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या नावे बोगस आदेश काढून नागरिकांना गंडवणारा हा जाहरीतील शुक्राचार्य कोण ? हे नागर...

(आर.टी.ओ.) असल्याचे सांगून पैसे वसूल करणाऱ्या दोघास अटक !

Image
   आर.टी.ओ. असल्याचे सांगून पैसे वसूल करणाऱ्या दोघास अटक ! शहरापासून जवळच असलेल्या बीड बायपास रोड जवळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) असल्याचे सांगून वाहन धारकांकडून पैसे वसूल करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.त्यांच्याकडील मोबाईल, वाहन, नगदी रक्कम असा एकूण ११ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल गुरुवारी जप्त केला. अजय बालाजी गाडगे (रा. अमृत नगर, डगलॅड, खंडोबा टेकडी, घाटकोपर, मुंबई) व दिनेश मंगल धनसर (रा. पांडुरंग वकीलवाडी, कलीना, मुंबई) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. बीड आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गणेश जयराम विघ्ने यांना बुधवारी सकाळी माहिती मिळाली की, बीड बायपास रोडवर एक जीप उभी असून, त्यावर आरटीओचा लोगो व दिवा आहे. आरटीओ अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून दोघेजण येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना रस्त्यात अडवून वाहनांची कागदपत्रे तपासून आम्ही आरटीओ असल्याचे सांगून पैसे वसूल करीत असल्याचे समजले. त्यानुसार त्यांच्याकडील वाहनाची माहिती घेतली असता ते वाहन ठाणे आरटीओ विभागात असल्याचे समजले. त्यावरून एम एच-०४ केआर-६४०४ या जीप वर आरटीओचा लोगो, स्टीक...

पंढरपूर नगर परिषदेचा आरोग्य कर आणि पार्किंग वसुलीचा ठेका रद्द !

Image
  पंढरपूर नगर परिषदेचा आरोग्य कर आणि पार्किंग वसुलीचा ठेका रद्द ! पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने आरोग्य व्यवस्था कर व पार्किंग कर वसुलीचा ठेका रद्द करण्यात आल्याची माहिती पालिकेचे उपमुख्यअधिकारी सुनील वाळुजकर यांनी दिली. या संदर्भात माहिती नागरिकांना व्हावी यासाठी पालिकेच्या वतीने समाज माध्यमांवर देखील एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.  याबाबत माहिती देत असताना पालिकेचे उपमुख्य अधिकारी वाळुजकर यांनी सांगितले की पंढरपूर शहरातील आरोग्य व्यवस्था कर व पार्किंग कर वसुली करता निर्मला ऑटो केअर सेंटर अ.नगर या कंपनीला ठेका देण्यात आलेला होता. मात्र ०५ मे २०२५ रोजी संध्याकाळी शहरातील गजानन महाराज मठ मागील रस्त्यावर कंपनीमार्फत नियुक्त कर्मचारी यांच्याकडून नाशिक विभागातील भाविक पंढरपूर मध्ये दर्शनासाठी आलेले असताना त्या भाविकांची गैरवर्तन केल्याचे फेसबुक लाईव्ह व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्याची गांभीर्याने दखल घेत नगरपरिषदेने निर्मला ऑटो केअर सेंटर अहमदनगर यांच्या आरोग्य व्यवस्था कर व पार्किंग कर वसुलीचा ठेका ८ मे पासून रद्द केला आहे. यापुढे आरोग्य कर्म पार्किंग कर देऊ नये पंढरपुरात आल्यानंतर...
Image
  मातृदिनाच्या निमित्ताने आईचे डिजिटल ज्ञानस्नान ! पंढरपूर ( दिनांक ११ मे २०२५ ) मातृदिनाचे औचित्य साधून IIT कॉम्प्युटर्स, पंढरपूर येथे एक आगळावेगळा आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांच्या आईंसाठी खास संगणक शिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या आईला स्वतः शिकवण्याचा अभिमान आणि आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.    या उपक्रमात IIT कॉम्प्युटर्सचे संचालक नितीन आसबे सर, दत्ता कळकुंबे सर, रोहिणी मांजरे मॅडम, वैष्णवी पाटील मॅडम यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात गुलाब पुष्प देऊन मातांचे स्वागत करून झाली.    विद्यार्थ्यांनी आपल्या आईला संगणक सुरू करणे, बंद करणे, टायपिंग करणे, ग्रेटिंग कार्ड तयार करणे, एक्सेलमध्ये निकाल बनवणे, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन तयार करणे, आर्टिफिशियल इंटेलीजेन्सी मध्ये वर्डआर्ट एआय चा वापर करणे, तसेच ‘ईरा’ प्रणालीविषयी माहिती देणे आणि ती वापरण्याचे प्रशिक्षण दिले. मातांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची उत्सुकता दिसून आली. पहिल्यांदाच संगणकासमोर बसलेल्या अनेक माता या अनुभवाने भारावून गेल्...