सोलापूर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली !
आज सोलापुर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मा.ना.जयकुमार गोरे साहेब यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी खासदार मा.धैर्यशील मोहिते-पाटील साहेब उपस्थित होते.
यावेळी उजनी धरण पर्यटन आराखाडा, महूद सांगोला महामार्गावरील वाकी शिवणे येथील मंदीर महामार्गात बाधित होत आहे इतर ठीकाणी मंदीर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.विजेचे प्रश्न,सौर कृषीपंप,सांगोला तालुक्यातील ट्रामा सेंटर तसेच सांगोला शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा सुरु करणे यासंबधीच्या सुचना खासदार मा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मांडल्या.
यावेळी जिल्ह्यातील खासदार,आमदार,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य,आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे..
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment