पंढरपूर बस स्थानकात महिलेचे गंठण लंपास !
पंढरपूर बस स्थानकात महिलेचे गंठण लंपास !
पंढरपूर बस स्थानकात महिलेचे गंठण चोरीस एसटी बस मध्ये चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅमचे सोन्याचे गंठण चोरट्याने चोरून नेले याबाबत सारिका पंडित लोकरे वय ४५ रा अंबड ता.माढा या महिलेच्या फिर्यादीवरून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी चारच्या सुमारास सारिका लोकरे या पंढरपूर येथील नवीन बस स्थानकामध्ये आई बायडाबाई गायकवाड यांच्यासोबत टेंभुर्णी बस मध्ये चढत होत्या त्यावेळी गर्दीचा फायदा घेत सारिका यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये.किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरट्याने जबरदस्तीने चोरून नेले म्हणून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हवालदार गोडसे करीत आहे.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment