पंढरपूर नगर परिषदेचा आरोग्य कर आणि पार्किंग वसुलीचा ठेका रद्द !
पंढरपूर नगर परिषदेचा आरोग्य कर आणि पार्किंग वसुलीचा ठेका रद्द !
पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने आरोग्य व्यवस्था कर व पार्किंग कर वसुलीचा ठेका रद्द करण्यात आल्याची माहिती पालिकेचे उपमुख्यअधिकारी सुनील वाळुजकर यांनी दिली. या संदर्भात माहिती नागरिकांना व्हावी यासाठी पालिकेच्या वतीने समाज माध्यमांवर देखील एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
याबाबत माहिती देत असताना पालिकेचे उपमुख्य अधिकारी वाळुजकर यांनी सांगितले की पंढरपूर शहरातील आरोग्य व्यवस्था कर व पार्किंग कर वसुली करता निर्मला ऑटो केअर सेंटर अ.नगर या कंपनीला ठेका देण्यात आलेला होता. मात्र ०५ मे २०२५ रोजी संध्याकाळी शहरातील गजानन महाराज मठ मागील रस्त्यावर कंपनीमार्फत नियुक्त कर्मचारी यांच्याकडून नाशिक विभागातील भाविक पंढरपूर मध्ये दर्शनासाठी आलेले असताना त्या भाविकांची गैरवर्तन केल्याचे फेसबुक लाईव्ह व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्याची गांभीर्याने दखल घेत नगरपरिषदेने निर्मला ऑटो केअर सेंटर अहमदनगर यांच्या आरोग्य व्यवस्था कर व पार्किंग कर वसुलीचा ठेका ८ मे पासून रद्द केला आहे.
यापुढे आरोग्य कर्म पार्किंग कर देऊ नये पंढरपुरात आल्यानंतर यापुढे कोणत्याही व्यक्तीस आरोग्य व्यवस्था कर व पार्किंग कर देऊ नये तसे निदर्शनास आल्यास त्वरित नगर परिषदेची संपर्क साधावा असे देखील अहवाल पालिकेच्या वतीने उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर यांनी केलेले आहे.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०).
Comments
Post a Comment