तुळजापूर शहरात किरकोळ कारणावरून मारहाण तिघांन विरुद्ध गुन्हा दाखल !

 तुळजापूर शहरात किरकोळ कारणावरून मारहाण तिघांन विरुद्ध गुन्हा दाखल  ! 

 तुळजापूर शहरात किरकोळ कारणावरून एकास लाथाबुक्यांनी आणि काठी, पाईपाने मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रेम लाल पवार (वय १८, रा. धाकट तुळजापूर) असे जखमी युवकाचे नाव असून, त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक १६ मे २०२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मलबा कॉर्नरजवळ दुर्वा वडापाव दुकानासमोर त्याच्यावर बप्पा रुपनर, पिंटू रुपनर आणि एका इतर इसमाने केवळ चुळ भरल्याचे पाणी अंगावर पडल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि काठी, पिवळा पाईपाने मारहाण केली.

यामध्ये प्रेम पवार हा गंभीर जखमी झाला असून, आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेची तक्रार २० मे रोजी दाखल करण्यात आली असून, त्यावरून तुळजापूर पोलिसांनी भा.दं.वि. कलम 118(1), 115(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.




लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 

                      मोहसीन इसाक खान.  

                       (८६०५१७१९१७).

                     रोहन हनुमंत हिवराळे..

                       ‌ ( ८६६८६१००५०)

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !