अवैध अतिक्रमण व जीवे मारण्याची धमकी : धाराशिवमध्ये गुन्हा नोंद

 धाराशिव – शहरातील उस्मानपुरा भागात एक गंभीर प्रकार उघडकीस आला असून, सरफराज अहमद जमील अहमद मोमीन (वय ३९, रा. मिल्ली कॉलनी, धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मालकीच्या जमिनीस अनधिकृतपणे अतिक्रमण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे

तक्रारीनुसार, दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी अंदाजे ७:३० वाजता सांजा रोड, उस्मानपूराजवळ, सर्वे नं. २१४/२(पे) या जमिनीवर आरोपी नामे सुनिल वाघमारे, लता वाघमारे व त्यांच्यासोबत असलेल्या अजून एका इसमाने अनधिकृतपणे अतिक्रमण करत सरफराज मोमीन यांना धमकावले. "जमिनीतून मागे हटले नाही तर जीवे मारू" अशी उघड धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे

ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असली, तरी सरफराज मोमीन यांनी २० मे २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलीसांनी भा.दं.वि. कलम ३२९(२), ३५१(२)(३), व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, जमिनीवरील अतिक्रमणाबाबत संबंधित महसूल यंत्रणेसही याची कल्पना देण्यात आली असून, कायदेशीर प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे


लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 

                      मोहसीन इसाक खान.  

                        (८६०५१७१९१७).

                      रोहन हनुमंत हिवराळे..

                       ‌ ( ८६६८६१००५०)

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !