पंढरपूर तालुक्यात ॲक्युपंक्चर मेडीकल कॉलेजला, महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची मान्यता.,
पंढरपूर तालुक्यात ॲक्युपंक्चर मेडीकल कॉलेजला, महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची मान्यता.,
12 वी नंतर वैद्यकीय व्यवसायात करीअर करण्याची विद्यार्थ्यांना संधी.- डॉ.सुधीर शिनगारे
पंढरपूर - शिवकमल कॉलेज ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सेस,भंडीशेगांव,ता.पंढरपूर या कॉलेजला महाराष्ट्र ॲक्युपंक्चर मुंबई, व वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाकडून डि.ए.टी. कोर्स करीता मान्यता प्रदान केल्याने पश्चिम महाराष्ट्रातील 12 वी पास विद्यार्थ्याकरींता मेडीकल क्षेत्रात करीअर करण्याची संधी मिळाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधीर शिनगारे यांनी दिली.
भंडीशेगांव ता. पंढरपूर येथील शिवस्वराज्य मेडीकल फाउंडेशन संचलित, शिवकमल कॉलेज ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सेस कॉलेजमध्ये डिप्लोमा इन ॲक्युपंक्चर थेरेपी हा दोन वर्ष अभ्यासक्रमाचा नवीन ॲक्युपंक्चर चिकीत्सा पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता 50 विद्यार्थी प्रवेश क्षमता असणार आहे. या अभ्यासक्रमासाठी 12 वी पास कोणताही शाखेचे विद्यार्थी प्रवेश घेवू शकतात. प्रचलित चिकित्सा पध्दती पैकी ॲक्युपंक्चर हे जुने शास्त्र असून परदेशात व भारतातही मोठया प्रमाणावर चा पध्दतीचा अवलंब करुन अनेक मोठया आजारावर यशस्वी पणे उपचार करण्यात येतात. या चिकित्सा पध्दती मध्ये संधीवात, गुडघेदुखी, ॲलर्जी, फुफुसाचे आजार, कॅन्सर, मेंदुचे विकार, मनोविकार, पाठदुखी, मानदुखी, पॅरालेसेस (लकवा) अशा अनेक आजारावर ॲक्युपंक्चर हे शास्त्र प्रभावीपणे काम करते. तसेच रोग प्रतिकारक क्षमता निर्माण केली जाते. पारंपारीक औष्ध पध्दतीचा सर्वात सामान्य प्रकार असून जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपारीक आणी पुरक औषधावरील जागतिक अहवालामध्ये 113 सदस्य राष्ट्रांनी या चिकित्सा पध्दतीला वापरण्यास मान्यता दिलेली आहे अशी माहिती डॉ.सुधीर शिनगारे यांनी दिली.
सदरचा डिप्लोमा इन ॲक्युपंक्चर थेरेपी या दोन वर्ष कालावधीसाठी सुसज्ज इमारत, प्रयोग शाळा, आवश्यक साधनसामुग्री, प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध करण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रातील हे एकमेव ॲक्युपंक्चर मेडीकल कॉलेज असणार आहे. हा कोर्स पुर्ण केलयानंतर विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी, ॲक्युपंक्चर मेडीकल कॉलेज मध्ये नौकरी करता येणार आहे. तसेच स्वत:चे ॲक्युपंक्चर क्लिीनीक / सेंटर सुरु करुन वैद्यकीय सेवा व्यवसाय सुरु करण्याची परवानगी महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषद यांचेकडून मिळणार आहे.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे..
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment