नांदगाव येथे भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रम पार पडला !

 नांदगाव येथे भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रम पार पडला !

नांदगाव (ता. तुळजापूर) 

           येथे.नवीन 33 के.व्ही. क्षमतेच्या वीज उपकेंद्राच्या (सबस्टेशन) भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम खासदार ओमराजे निंबाळकर.यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रकल्पामुळे नांदगावसह परिसरातील शेती, उद्योगधंदे व घरगुती वीजपुरवठा अधिक सक्षम व नियमित होणार असून, ही एक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा ठरणार आहे.


 या कार्यक्रमाला खासदार ओमराजे निंबाळकर,कमलाकर चव्हाण, अशोक भाऊ पाटील, गजेंद्र पाटील, प्रकाश चव्हाण, कृष्णाथ मोरे, सूर्यकांत अरबळे, परमेश्वर चिनगुंडे, गिरीश नवगिरे, राजेंद्र जाधव, सोमनाथ परशेट्टी, बाळू मारेकर आणि राजू मोर यांची प्रमुख उपस्थिती होती.

         या सबस्टेशनच्या मंजुरीसाठी शिवसेना पक्षाचे सूर्यकांत अरबळे यांनी विशेष प्रयत्न केले. कोरोनासारख्या कठीण परिस्थितीतही त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत हा प्रकल्प मंजूर करून घेतला. त्यांची जिद्द, चिकाटी आणि लोकहितासाठीची तळमळ उल्लेखनीय आहे.

या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील वारंवार होणाऱ्या वीज खंडित समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा मिळणार असून, भविष्यातील वाढती वीज मागणीही पूर्ण करता येईल. नांदगाव परिसराच्या प्रगतीचा हा एक नवा टप्पा ठरणार आहे.



लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 

                      मोहसीन इसाक खान.  

                       (८६०५१७१९१७).

                     रोहन हनुमंत हिवराळे..

                       ‌ ( ८६६८६१००५०)

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !