बोगस आदेश काढून नागरिकांना गंडवणारा हा इसम कोन?
बोगस आदेश काढून नागरिकांना गंडवणारा हा इसम कोन ?
पंढरपूर ( प्रतिनिधी )
शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेला गुन्ह्यात जमीन देणार, घेणार आणि ओळख देणार यांच्यावर आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे परंतु बोगस आदेश कोणी काढला हा मोठा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. सह दुय्यम निबंधक वर्ग दोन कार्यालयात यासारखे अनेक बोगस दस्त यापूर्वीही नोंदले गेले आहेत.
गुंठेवारी रद्द झाल्यापासून या प्रकाराचे आदेश काढून दस्त नोंदवण्यात आले आहे या सर्वच बोगस दस्ताची चौकशी होणार काय ? उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या नावे बोगस आदेश काढून नागरिकांना गंडवणारा हा जाहरीतील शुक्राचार्य कोण ?
हे नागरिकांसमोर येणे गरजेचे आहे बोगस दस्ताऐवज बनवून वापरात आणणे यासाठी कायद्यात वेगळ्या कलमांची तरतूद आहे परंतु असे एकही कलम सदर होण्यातील आरोपींना लावण्यात आले नाही पोलीस तपास झाल्यास बोगस आदेश काढणारा बाहेरी येईल?
अशी खात्री बाळगण्यास हरकत नाही परंतु सह दुय्यम निबंधांकडून आरोपींना सवलत देण्यात आली आहे काय ? या जहारीतील शुक्राचार्याला वाचवण्याचा आटापटा अधिकाऱ्यांकडून झाला आहे काय ? अशी चर्चा पंढरपूर तालुक्यातील नागरिकांमधून होऊ लागली आहे.
पोलीस काय म्हणतात ?
सह दुय्यम निबंधक यांनी दिलेला आदेशाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा दिवाणी मॅटर असल्यामुळे त्यांनी दिलेला आदेशाप्रमाणेच गुन्हा दाखल केला आहे असे ठाणे अंमलदार यांनी सांगितले यावरून या प्रकरणात काहीतरी पाणी मुरल्याची पटत आहे
कोर्टी येथील बेकायदेशीर जमीन व्यवहार झाला यामध्ये बोगस बनवण्यात आल्याची खात्री पटली यामुळे असे बोगस आदेश बनवणारा जहारीतील शुक्राचार्य बाहेर येणार अशी खात्री वाटतच असताना या शुक्राचार्याचे नाव या गुन्ह्यातच आले नाही .पोलीस तपास तरी हा शुक्राचार्य नागरिकासमोर येणार काय अशी चर्चा नागरिकांमधून होऊ लागली आहे.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०).
Comments
Post a Comment