Posts

Showing posts from June, 2025

पत्रकारांसाठी घरकुल योजना राबवा पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

Image
 सोलापूर, प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज, नेटवर्क महाराष्ट्र पत्रकारांसाठी घरकुल योजना राबवा पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.     पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित घटकासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या  सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतः ची पक्की घरे नाहीत सोलापूर शहर जिल्ह्यातील  बहुसंख्य पत्रकार  पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात राहत असून अल्प मानधन व तुटपुंजा मिळणाऱ्या जाहिरातीमुळे त्यांना स्वतःची मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घेता आली नाहीत  कोरोना सारख्या  जीवघेण्या काळात  पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून  केंद्र सरकार राज्य सरकार चे कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी आहे पत्रकारानी पार पाडली आहे  स्वतःची पक्की...

मानवाच्या सदृढ आरोग्यासाठी दैनंदिन योगा करणे आवश्यक - प्रणव परिचारक

Image
पंढरपूर प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र मानवाच्या सदृढ आरोग्यासाठी दैनंदिन योगा करणे आवश्यक - प्रणव परिचारक  पंढरपूर शहरात 11वा आंतरराष्ट्रीय योग महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा          पंढरपूर शहरामध्ये पतंजलि योगपीठ हरिद्वार शाखा पंढरपूर व पंढरपूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय आणि उमा महाविद्यालय पंढरपूर व युवा नेते प्रणवजी परिचारक यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरातील श्री संत तनपुरे महाराज मठ येथे सकाळी6.30 ते 8.00 या कालावधीमध्ये मोठ्या उत्साहाने 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.        सदर कार्यक्रमास युवक नेते प्रणव परिचारक, माननीय श्री सचिन इथापे प्रांताधिकारी पंढरपूर ,माननीय श्री सचिन लंगोटे तहसीलदार पंढरपूर, पंचायत समिती पंढरपूर कर्मचारी वृंद, पंढरपूर शहर पोलीस प्रशासनचे PSI श्री संजय मुळे , महिला PSI मोनिका खडके पाटील PSI सुप्रिया रावण, उमा महाविद्यालयाचे प्राचार्य श्री धीरज कुमार बाड सर व त्यांचे प्राध्यापक वृंद, पंढरपूर शहर भाजप अध्यक्ष श्री लाला पानकर , भाजप प्रभारी श्री अक्षय वाडकर, भाऊ टमटम...

कुर्डूवाडी-पंढरपूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा वारकरी, वाहनधारकांचा जीव धोक्यात; रस्ता दुरुस्तीची मागणी

Image
प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र कुर्डूवाडी :  मराठवाडा तसेच विदर्भातून येणार्‍या वारकर्‍यांच्या दिंड्या व विविध वाहने कुर्डूवाडी मार्गानेच पंढरपूरला जातात. वाटेतील बावी तसेच रोपळे या दोन गावांत रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे वारकरी व वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळाच बनला आहे. पाच वर्षांपासून शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अपघातात अनेक जण ठार झालेले आहेत, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत कुर्डूवाडी ते पंढरपूर हा सिमेंटचा तीन पदरी रस्ता सहा वर्षांपूर्वी बनवण्यात आलेला आहे. सुरुवातीपासून हा रस्ता निकृष्ट असल्यामुळे या रस्त्याला जागोजागी मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. ठेकेदाराने या भेगेमध्ये अनेक ठिकाणी सिमेंट भरून तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे. रस्त्यावर विविध छोटे-मोठे पूल बांधलेले आहेत. कुर्डूवाडी शेजारील पुलाला तर मोठे भगदाड पडलेले असते, या ठिकाणी हा ठेकेदार वारंवार येऊन हे भगदाड बुजवण्याचा प्रयत्न करतो. सर्वच पूल निकृष्ट जड वाहने जाताना गाड्यांचा मोठा आवाज येतो. बावी गावाजवळून जाणार्‍या 100 मीटरचा रस्ता तेथील शेतकर्‍यांनी अडवलेला आहे, त्याला नुकसा...

मुंबई उच्च न्यायालयातून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी ५८ वर्षीय आरोपीस सशर्त जामीन मंजूर!

 प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र सोलापूर येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या ५८ वर्षीय आरोपी बुडण रहिमबक्ष बागवान (रा. रेल्वे लाईन, सोलापूर) यांना _मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. श्री. अश्विन भोबे_ यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. सदर बझार पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध गु.र. क्र. ०३०३/२०२४ नुसार भारतीय दंड संहिता कलम ३५४, ३७६, ३७६(२)(एन), ३७७ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, १२, १७, २१ अन्वये २७ एप्रिल २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात, सोलापूरमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय पीडितेवर आरोपी बुडण बागवानने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. पीडितेने सुरुवातीला भीतीपोटी कोणालाही सांगितले नव्हते, परंतु सततच्या त्रासाला कंटाळून तसेच आरोपी हा पीडित अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन तिला कशाची तरी फूस लावून तिच्याशी वारंवार गैरवर्तन करत होता. तथापि, पीडितेने तिच्या आईच्या मदतीने समाजातील काही व्यक्तींचा आधार घेऊन अशा प्रकारची फिर्याद पोलिसांत दाखल केली होती. सदर आरोपीचा...

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

Image
पंढरपूर तालुका प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्युज, नेटवर्क महाराष्ट्र लक्ष्मी टाकळी येथे पत्नीच्या चारित्र्याच्या संशय घेत पतीने मध्यरात्री पत्नीवर कुऱ्हाडीने,वार करून खून केल्याची घटना घडली आहे दरम्यान पत्नीला मारहाण करताना आईला वाचवण्यासाठी आलेल्या दोन मुलांवरही वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती अशी आहे की लक्ष्मी टाकळी येथील मारुती मंदिरासमोर राहणारे तानाजी जालिंदर उबाळे (वय, ४०) याने आपली पत्नी सौ पल्लवी तानाजी उबाळे (वय, ३५) हिचेवर चारित्र्याचा संशय घेऊन भांडणाला सुरुवात केली पती-पत्नीचे भांडण विकोपाला जाऊन पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात  कुऱ्हाडीने.घाव घालून तिला जीवे ठार मारले दरम्यान पती-पत्नीचे भांडण व मारहाण सुरू असतानाच आपल्या आईला वाचवण्यासाठी त्यांची दोन लहान मुले पुढे आले असता मुलांच्या डोक्यातही त्याने कुऱ्हाडीने घाव घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे यानंतर घरातील गॅस पेटवून देऊन आग लावून मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याबाबत तानाजी जालिंदर उबाळे यां...

सोलापूर जिल्हा भाजप युवा मोर्चा सचिव हरीशभाऊ घोणे यांच्या वाढदिवसानिमित्त

Image
प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र  भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव हरिशभाऊ घोणे यांच्या  वाढदिवसानिमित्त हार- तुरे,शाल- फेटा न स्विकारता वही,पेन स्वीकारत    अनावश्यक खर्चाला फाटा देत शालेय साहित्य आणी खाऊ वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोषभाऊ क्षीरसागर,जिल्हा उपाध्यक्ष महिला आशाताई घाडगे,तालुकाध्यक्ष महिला प्रतीक्षाताई गोफणे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, डाॅ. मोहसीन मकणु,अल्पसंख्याक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रियाज शेख,लेखिका निलावती कांबळे,भाजप युवा नेत्या स्वाती ताई  गोरे, तिरंगा ग्रुप अध्यक्ष अर्शद मुलाणी, पत्रकार सतीश महिंगडे,   मनसे विद्यार्थी तालुकाध्यक्ष युवराज कोळी,अहमद पठाण,  पत्रकार सागर कांबळे, युवा नेते रोहीत शिंदे,युवा नेते दत्ता आप्पा वाघमारे,युवा नेते रफिक सय्यद,प्रकाश किर्वे महाराज,युवा नेते इम्रान पठाण,युवा नेते जावेद पठाण,  अशितोष पावले सर, अमर जगताप सर,नितीन कोळी मेजर,  शिरीष माने, अभिषेक क्षीरसागर,प्रशांत बेंद्रे, बाळु क्षीरसागर,शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिक...

लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत तसेच तालुका पोलीस स्टेशन व.स्वेरी कॉलेज गोपाळपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने

Image
पंढरपूर प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र  लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत तसेच तालुका पोलीस स्टेशन व स्वेरी कॉलेज गोपाळपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज लक्ष्मी टाकळी येथे टाकळी ते जुना गोपाळपूर रस्ता नुकताच मजबुतीकरण व सुधारणा करण्यात आली आहे त्या रस्त्याच्या दोन्हीही बाजू तसेच शिवरील देवी मंदिराच्या बाजूने वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले याप्रसंगी हरित वारी ह्या उपक्रमात आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या उपक्रमाचे नियोजन करीत असताना टाकळी गावांमध्ये आज त्याची अंमलबजावणी करण्यात आली आज टाकळी ग्रामपंचायतने 1500 वृक्षरोपण करण्याचा संकल्प केला त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात आज करण्यात आली त्याप्रसंगी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री टी वाय मुजावर टाकळी गावचे सरपंच संजय साठे तसेच माझी पोलीस अधिकारी नानासाहेब कदम तसेच पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी सेवेरी कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी तसेच पोलीस किसान संस्थेचे चेअरमन राजाभाऊ पाटील हनुमंत राव माने टाकळी गावचे उपसरपंच रूपाली ताई...

शाळेचा पहिला दिवस गोपाळपूर येथे विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत

Image
पंढरपूर शहर प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र राज्यभरातील शाळांमध्ये आज नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साही सुरुवात झाली. उन्हाळी सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि आनंद ओसंडून वाहत होता.  पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्या दिवशी भाजपा तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुभाष मस्के व ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेच्या प्रवेशद्वारात गुलाब पुष्प देऊन आणि विद्यार्थ्यांवर फुलांची उधळण करत फटाक्याची आतिषबाजी करून करण्यात आले.  शाळेचा पहिला दिवस असल्याने प्रवेशद्वार फुग्यांनी, फुलांनी सजवण्यात आले होते.   यावेळी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व जिलेबी वाटप करून करण्यात आली. यावेळी प्राध्यापक सुभाष मस्के, ज्येष्ठ नेते दिलीप गुरव यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी खास स्वागतपर भाषणे केली. शिक्षकांनी शैक्षणिक वर्षात होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.  यावेळी उदय पवार, दत्तात्रय गुरव, लक्ष्मण लेंगरे, अरुण बनसोडे, शिवाजी माने, अजय जाधव, अमोल पाटील, उल्हास कोले, गणेश माने, हनुमंत लेंगरे, रघुनाथ पवार ...

पोलीस कोठडीत आरोपीस मारहाण प्रकरण दोन अधिकाऱ्यांवरील कारवाईचा आदेश रद्द

पंढरपूर, शहर प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्युज नेटवर्क, महाराष्ट्र पंढरपूर ता. 12,  पोलीस कोठडीतील एका आरोपीस रिवाल्वरच्या सहाय्याने धमकावून काठीच्या सहाय्याने मारहाण करून छळ केल्याच्या कारणावरून दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध येथील प्रथमवर्ग न्यायालयाने आरोपी समन्स काढण्याबाबत व कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्या प्रकरणी दाखल करण्यात आलेला रिव्हीजन अर्ज मान्य करून सत्र न्यायाधीश श्री. नंदीमठ यांनी प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेला आदेश रद्द केला आहे.  या प्रकरणाची हकीगत अशी की.... प्रकरणी महादेव वसंत खिलारे यांना पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीत असताना खिलारे यांना तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण अवचर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांनी रिवाल्वर च्या सहाय्याने धमकावले आणि काठीच्या सहाय्याने मारहाण केली अशी तक्रार आरोपी खिलारे यांनी केली होती. त्याप्रकरणी पंढरपूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी दोन्ही पोलीस अधिकारी यांचे विरुद्ध कलम 324, 506 सह 34 भारतीय दंड विधान प्रमाणे आरोपी समन्स काढणे बाबत व कारवाई करणे बाबत आदेश केला होता. याप्रकरणी वरील ...

अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक

 प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र  खरेदी दस्तावरून सात-बारावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती तीन हजार रुपये घेताना अक्कलकोट मधील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधविभागाने रंगेहाथ पकडले. फिर्यादींनी दोन जूनला दस्तानुसार अक्कलकोट येथील गट क्र 54/4/ब मधील एक हेक्टर जमीन खरेदी केली. या खरेदीवरून सात-बारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी त्यांनी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) अरुण मारुती शेवाळे (रा. अक्कलकोट, मूळ गाव पुणे शहर) यांच्याकडे रीतसर कागदपत्रे दिली. नोंद उतार्‍यावर घेण्यासाठी शेवाळे यांनी फिर्यादीकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले. फिर्यादींनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर शेवाळे यांना तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे-खराडे, पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिंग...

आषाढी एकादशीनिमित्त विशेष रेल्वे गाड्या

Image
 प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र  आषाढी एकादशीनिमित्त वारकर्‍यांच्या सोयीसाठी रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. नागपूर, पुणे, कलबुर्गी आणि कोल्हापूर येथून या गाड्या धावणार आहेत. त्यामुळे वारकरी आणि प्रवाशांची सोय होणार आहे. दि. 6 जुलैरोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशी पार पडणार आहे. यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी या ठिकाणी येत असतात. परंतु सध्या सुरू असणार्‍या रेल्वे गाड्यांवर याचा अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून नागपूर-मिरज, पुणे-पंढरपूर-मिरज, मिरज-कलबुर्गी आणि कोल्हापूर-पंढरपूर-कुर्डुवाडी या जादा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर ते मिरज ही गाडी दि. 4 व 5 रोजी नागपूर येथून सकाळी 8.50 मिनिटांनी सुटेल. ती पंढरपूर येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वाजता पोहोचेल, तर मिरजेत दुपारी 12 वाजता येईल. परतीच्या प्रवासात ही गाडी मिरजेतून 1 वाजता सुटेल, पंढरपूर येथे दुपारी 4 वाजता, तर नागपूर येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 12.25 पोहोचेल. पुणे-पंढरपूर-मिरज ही गाडी दि. 3 ते 7 जुलै दरम्यान पुण्यातून सकाळी 8.40 वाजता सुटेल...

गोव्यावरून सोलापूरला विमान आले सर्वांनी शिट्ट्या अन् टाळ्या वाजवून केले स्वागत

Image
सोलापूर, शहर प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र सोलापूर : अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरकरांना आता विमानाने गोव्याला प्रवास करता येणार आहे या विमानसेवेचा शुभारंभ सोमवारी झाला गोव्यामधून दहा वाजून पंधरा मिनिटांनी विमानाचे उड्डाण झाले हे विमान सोलापुरात सव्वा अकराच्या सुमारास उतरले याच वेळेस कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवरांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्या विमानाचे स्वागत केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत होणार होता परंतु मुंबईमध्ये वातावरण खराब असल्याने त्यांचे विमान उडू शकले नाही. पण केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे मात्र सोलापूरला आले. पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राम सातपुते, आमदार राजू खरे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार अभिजीत पाटील, शहाजी पवार, अमोल शिंदे, पंढरपूर मंगळवेढ्याचे युवा नेते प्रणव परिचारक, त्यांच्या उपस्थितीत सोल...

तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी मास्क व सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक – व्यवस्थापन समितीचा महत्वाचा निर्णय

Image
तुळजापूर, शहर प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क तुळजापूर, - महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात दरवर्षी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व इतर राज्यांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. परंतु सध्या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिर आवाहनात नमूद करण्यात आले आहे की, दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहील. तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी प्रशासनाने केलेल्या या आवाहनाची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिर संस्थानचे कार्यकारी अधिकारी श्री. अभिजीत चव्हाण यांनी केले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी हे नियम कठोरपणे पाळण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क              ...

आगामी हंगामात शंभर टक्के ऊसतोडणी यंत्राद्वारेच : देशमुख

Image
प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क लातूर : शिक्षणासाठी ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा नेहमीच होते. आता नव्या पॅटर्नची चर्चा सुरू आहे. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सुरू केलेला हार्वेस्टर ऊस तोडणी पॅटर्न राज्यभर चर्चेचा विषय झाला आहे. पुढील हंगामात तब्बल ८० हार्वेस्टर यंत्रांचा वापर करण्याची घोषणा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केली आहे. ऊसतोड शंभर टक्के हार्वेस्टरद्वारे होईल. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना मालकीचे सध्या ८ हार्वेस्टर आहेत. येणाऱ्या हंगामासाठी आणखी १७ हार्वेस्टर घेवून, कारखाना हमीवर लातूर जिल्हा बँकेमार्फत दिलेले ४३ आणि इतर अशा एकूण ८० हार्वेस्टरद्वारे ऊसतोडीचा निर्णय झाल्याचे कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी मिल रोलर पूजन कार्यक्रमावेळी जाहीर केले. येणाऱ्या गाळप हंगामामध्ये कारखान्याने ९ लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असेही ते म्हणाले. लातूर येथील मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे मिल रोलरचे पूजन दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व लातूरचे माजी पालकमंत्री, आमदार अमित देशम...

संजय गांधी नॅशनल पार्कच्या वन हद्दीत अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट; जबाबदार कोण ?

Image
  संजय गांधी नॅशनल पार्कच्या वन हद्दीत अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट; जबाबदार कोण ? जानू पाडा वैभव नगर, पांडे कंपाऊंडमध्ये अनाधिकृत दुमजली बांधकामांचे थैमान; कायद्याची पायमल्ली, वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह मुंबई :मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कच्या (Sanjay Gandhi National Park) अत्यंत संवेदनशील वन हद्दीत समाविष्ट असलेल्या जानू पाडा वैभव नगर आणि पांडे कंपाऊंड परिसरात अनाधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात बोकाळल्याने प्रशासकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. या बांधकामांविषयी अनेकदा सविस्तर तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने, यामागे प्रशासकीय यंत्रणेतील संबंधित अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय बळावला आहे. या गंभीर प्रकरणामुळे उद्यानाशी संबंधित काही अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी जोर धरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानू पाडा वैभव नगर आणि पांडे कंपाऊंडमधील वन जमिनींवर, विशेषतः पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (Ecologically Sensitive Zone - ESZ) आणि वन कायदा १९८० (Forest Conservation Act, 1980) अंतर्गत संरक्षित असलेल्या क्षेत्रांमध्ये, अनधिकृतपणे पक्की बांधकामे (उदा. RCC...

कांदिवली पूर्वेकडील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण ?

Image
  कांदिवली पूर्वेकडील अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण ? कांदिवली पूर्वेकडील सिंग इस्टेट, रोड नंबर 0 ते ५ , आझाद वाडी, दामू नगर, लक्ष्मी नगर येथील नवीन अनधिकृत बांधकामांमधील वाढ आणि त्यात विशेषतः प्रशिक्षित नसलेल्या कंत्राटदारांकडून सर्रासपणे दुमजली बांधकामे केली जात असल्याचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. ही बेफिकीर बांधकामे केवळ नियमांचे उल्लंघन करत नाहीत, तर नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण करतात. या परिस्थितीला अनेक घटक जबाबदार आहेत आणि त्यांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे:   मुंबई महानगरपालिका (BMC) आणि तिचे अधिकारी:    अंमलबजावणीतील निष्क्रियता: मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ नुसार (विशेषतः कलम ३५४ए) सहाय्यक अभियंत्यांना (इमारत व कारखाना) अनधिकृत बांधकामे थांबवण्याचे आणि पाडण्याचे तात्काळ अधिकार आहेत. तरीही, कारवाई होत नाही. या निष्क्रियतेमुळेच बांधकामांना प्रोत्साहन मिळते.     भ्रष्टाचार:  अनेकदा अशा बेकायदेशीर बांधकामांना प्रशासकीय स्तरावर अप्रत्यक्ष पाठिंबा मिळत असल्याचा आरोप होतो. आर्थिक व्यवहारांमुळे कारवाई टाळली जाते, ज्यामुळे कंत्राटदार...

कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना

Image
 प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क  लातूर - सातारा जिल्ह्यातील कराड स्थानकातून सकाळी १०.४५ वाजता लातूरकडे मार्गस्थ झालेली बस लातूरनजीक रामेगाव पाटी येथे बुधवारी रात्री ८ वाजता उलटली. या अपघातात बसमधील ७० प्रवाशांपैकी १७ प्रवासी जखमी झाले असून, ५३ जण सुखरुप आहेत. खाेदलेल्या साईडपट्टीमुळे अरुंद रस्त्यावर निसरड्या ठिकाणावरुन बस अलगद उलटल्याने बहुतेकांना इजा झाली नाही. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना रुग्णवाहिकेतून लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लातूर-बार्शी महामार्गाचे सध्या काम सुरु आहे. तेथून लातूर अवघ्या १५ किलाेमीटर अंतरावर असताना रस्त्यालगतच्या खाेदकामाचा अंदाज अनेक वाहनांना येत नाही. शिवाय, रस्त्यालगत दिशादर्शक फलक, चिन्हेही ठेवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे बसचालकाला अंदाज न आल्याने बस अचानक उलटली. बसचा वेग कमी असल्याने फारशी हानी झाली नाही. रस्त्यावरुन जा-ये करणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने थांबवत घटनास्थळाकडे धाव घेतली. रात्रीची वेळ असल्याने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा आराडाओरडा सुरु हाेता. नागरिकां...

दक्षिणा पेटीतून लाखोंची रोकड चोरणारा साईसंस्थानचा कर्मचारी गोंदकर याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

Image
 प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क  साईबाबा संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या बाळासाहेब गोंदकर या शिपायाने दक्षिणा पेटीतून लाखो रुपयांची रोकड चोरल्याचे उघडकीस आले आहे. अविनाश विनायक कुलकर्णी, लेखाधिकारी, यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. संस्थानच्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या दक्षिणा मोजणीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत हा प्रकार समोर आला. बाळासाहेब नारायण गोंदकर, लेखा विभागातील शिपाई, यांनी ४, ८ आणि ११ एप्रिल रोजी दक्षिणा मोजणीदरम्यान ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल चतुराईने लपवले आणि नंतर ते चोरून नेले. ही चोरी झालेली रक्कम अंदाजे सव्वा ते दीड लाख रुपये दरम्यान असण्याची शक्यता आहे. १६ एप्रिल रोजी दक्षिणा मोजणी पूर्ण झाल्यावर नोट मोजणी मशिनमध्ये ४६ हजार ५०० रुपये आणि २५ एप्रिल रोजी ५०० रुपयांचा आणखी एक बंडल (४५ ते ५० हजार रुपये) आढळून आला. या दोन्ही घटना संशयास्पद वाटल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी गोंदकर नोटा लपवताना स्पष्ट दिसले. त्यांनी नोटा मांडीखाली, पॅन्टमध्ये आणि मशीनच्या मागे लपवून नंतर घेऊन गेल्याचे फ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम, आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना

Image
प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी चार आठवड्यांमध्ये प्रक्रिया सुरू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने तशी पावले टाकली आहेत. प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात आली असून, राज्य सरकारकडून प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्यावर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच महिन्यात निवडणुकांची प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश दिला. तसेच चार आठवड्यांत अधिसूचना जारी करण्याचा निर्देश दिला होता. यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. प्रभाग रचनेचे अधिकार महाविकास आघाडीच्या काळात सरकारने स्वत:कडे घेतले होते. यानुसार प्रभाग रचना पूर्ण करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारकडून प्रभागांची रचना करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. राज्य सरकारकडून या आठवड्यात प्रभाग रचनेची माहिती राज्य निवडणूक आयोगाला सादर ...

नाशिक तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल बिबट्याच्या मुक्तसंचाराने घेतला चिमुकल्याचा जीव

Image
नाशिक, प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क दिंडोरी तालुक्यातील निळवंडी रोडवरील जाधव वस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात रुद्र अमोल जाधव (वय ९) या बालकाचा मृत्यू झाला आहे. एकाच महिन्यात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शनिवारी (दि.31) रोजी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास रुद्र आपल्या आजोबांबरोबर फेरफटका मारण्यासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी जवळच असलेल्या नालीमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने रुद्रवर झडप घालून त्याला ओढत शेजारी असणाऱ्या ओहळाकडे नेले. आजोबा दत्तू जाधव यांनी आरडाओरड केली असता परिसरातील नागरिकांनी धाव घेत बिबट्याचा पाठलाग केला. त्यामुळे बिबट्याने रुद्राला सोडून धूम ठाेकली. त्यानंतर रुद्रला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी रुद्रला मृत घोषित केले. घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मखमलाबाद शिवारात बिबट्याचे दर्शन संतप्त नागरिकांनी केला रास्ता रोको रुद्रच्या मृत्यूमुळे संतप्त नागरिकांनी शनिवारी (दि.31) रोजी रात्री ११ वाजता नाशिक–कळवण–गुजरात या प्रमुख म...