पोलीस कोठडीत आरोपीस मारहाण प्रकरण दोन अधिकाऱ्यांवरील कारवाईचा आदेश रद्द

पंढरपूर, शहर प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्युज नेटवर्क, महाराष्ट्र

पंढरपूर ता. 12, 

पोलीस कोठडीतील एका आरोपीस रिवाल्वरच्या सहाय्याने धमकावून काठीच्या सहाय्याने मारहाण करून छळ केल्याच्या कारणावरून दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध येथील प्रथमवर्ग न्यायालयाने आरोपी समन्स काढण्याबाबत व कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्या प्रकरणी दाखल करण्यात आलेला रिव्हीजन अर्ज मान्य करून सत्र न्यायाधीश श्री. नंदीमठ यांनी प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेला आदेश रद्द केला आहे. 

या प्रकरणाची हकीगत अशी की.... प्रकरणी महादेव वसंत खिलारे यांना पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीत असताना खिलारे यांना तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण अवचर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांनी रिवाल्वर च्या सहाय्याने धमकावले आणि काठीच्या सहाय्याने मारहाण केली अशी तक्रार आरोपी खिलारे यांनी केली होती. त्याप्रकरणी पंढरपूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी दोन्ही पोलीस अधिकारी यांचे विरुद्ध कलम 324, 506 सह 34 भारतीय दंड विधान प्रमाणे आरोपी समन्स काढणे बाबत व कारवाई करणे बाबत आदेश केला होता. याप्रकरणी वरील दोन्ही पोलीस अधिकारी यांनी 

ॲड. एम.एम. काणे आणि ॲड. 

 चंद्रशेखर पोरे यांचे मार्फत येथील सत्र न्यायालयात रिव्हीजन अर्ज दाखल करून आदेशास आव्हान दिले होते. 

सदर रिव्हीजन अर्जाची सत्र न्यायाधीश श्री नंदिमठ यांच्या पुढे

गुणदोषावर सुनावणी होऊन सुनावणी अंती ॲड. एम.एम.काणे व ॲड.

चंद्रशेखर पोरे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सदर रिव्हीजन अर्ज मंजूर करून पंढरपूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी आरोपी समन्स काढणे बाबत केलेला आदेश  रद्द करून रिव्हीजन अर्ज 

मंजूर केला. सदर रिव्हीजन अर्जाचे कामी अर्जदार यांचे तर्फे ॲड. एम.एम.काणे व ॲड.

चंद्रशेखर पोरे यांनी कामकाज पाहिले.



लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 

                      मोहसीन इसाक खान.  

                       (८६०५१७१९१७).

                     रोहन हनुमंत हिवराळे.

                       ‌ ( ८६६८६१००५०)




Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !