तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी मास्क व सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक – व्यवस्थापन समितीचा महत्वाचा निर्णय

तुळजापूर, शहर प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क



तुळजापूर, - महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात दरवर्षी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व इतर राज्यांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. परंतु सध्या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिर आवाहनात नमूद करण्यात आले आहे की, दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहील.

तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी प्रशासनाने केलेल्या या आवाहनाची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिर संस्थानचे कार्यकारी अधिकारी श्री. अभिजीत चव्हाण यांनी केले आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी हे नियम कठोरपणे पाळण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत




लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 

                      मोहसीन इसाक खान.  

                       (८६०५१७१९१७).

                     रोहन हनुमंत हिवराळे.

                       ‌ ( ८६६८६१००५०)








Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !