आगामी हंगामात शंभर टक्के ऊसतोडणी यंत्राद्वारेच : देशमुख

प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क

लातूर : शिक्षणासाठी ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा नेहमीच होते. आता नव्या पॅटर्नची चर्चा सुरू आहे. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सुरू केलेला हार्वेस्टर ऊस तोडणी पॅटर्न राज्यभर चर्चेचा विषय झाला आहे. पुढील हंगामात तब्बल ८० हार्वेस्टर यंत्रांचा वापर करण्याची घोषणा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केली आहे.

ऊसतोड शंभर टक्के हार्वेस्टरद्वारे होईल. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना मालकीचे सध्या ८ हार्वेस्टर आहेत. येणाऱ्या हंगामासाठी आणखी १७ हार्वेस्टर घेवून, कारखाना हमीवर लातूर जिल्हा बँकेमार्फत दिलेले ४३ आणि इतर अशा एकूण ८० हार्वेस्टरद्वारे ऊसतोडीचा निर्णय झाल्याचे कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी मिल रोलर पूजन कार्यक्रमावेळी जाहीर केले.

येणाऱ्या गाळप हंगामामध्ये कारखान्याने ९ लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असेही ते म्हणाले.

लातूर येथील मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे मिल रोलरचे पूजन दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व लातूरचे माजी पालकमंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी करण्यात आले. त्यानंतर संचालक मंडळाची गळीत हंगाम आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, ‘ट्‌वेंटी वन शुगर ‘चे उपाध्यक्ष विजय देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले, मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, कारखान्याचे संचालक श्रीशैल उटगे, रेणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित होते.



लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 

                      मोहसीन इसाक खान.  

                       (८६०५१७१९१७).

                     रोहन हनुमंत हिवराळे.

                       ‌ ( ८६६८६१००५०)



Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !