मुंबई उच्च न्यायालयातून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी ५८ वर्षीय आरोपीस सशर्त जामीन मंजूर!

 प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र

सोलापूर येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या ५८ वर्षीय आरोपी बुडण रहिमबक्ष बागवान (रा. रेल्वे लाईन, सोलापूर) यांना _मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. श्री. अश्विन भोबे_ यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. सदर बझार पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध गु.र. क्र. ०३०३/२०२४ नुसार भारतीय दंड संहिता कलम ३५४, ३७६, ३७६(२)(एन), ३७७ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, १२, १७, २१ अन्वये २७ एप्रिल २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकरणात, सोलापूरमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय पीडितेवर आरोपी बुडण बागवानने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. पीडितेने सुरुवातीला भीतीपोटी कोणालाही सांगितले नव्हते, परंतु सततच्या त्रासाला कंटाळून तसेच आरोपी हा पीडित अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन तिला कशाची तरी फूस लावून तिच्याशी वारंवार गैरवर्तन करत होता. तथापि, पीडितेने तिच्या आईच्या मदतीने समाजातील काही व्यक्तींचा आधार घेऊन अशा प्रकारची फिर्याद पोलिसांत दाखल केली होती. सदर आरोपीचा जामीन अर्ज सोलापूर येथील विशेष न्यायालयाने फेटाळला होता.त्यानंतर आरोपी बुडण बागवानने आपला जामीन अर्ज मा. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी, ॲड. अद्वैत शुक्ला, ॲड. दत्तात्रेय कापुरे यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे ॲड. अ. अ. पालकर यांनी काम पाहिले,





लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 

                      मोहसीन इसाक खान.  

                       (८६०५१७१९१७).

                     रोहन हनुमंत हिवराळे.

                       ‌ ( ८६६८६१००५०)


Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !