Posts

Showing posts from July, 2025

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वारकरी भाविकांशी साधला संवाद करेक्ट नियोजन बद्दल भाविक भक्तांकडून समाधान व्यक्त,

Image
 प्रतिनिधी, पंढरपूर शहर लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र  आषाढी यात्रा सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत असून आषाढी यात्रा सोहळा कालावधीत राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. श्री.विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून, दर्शनरांग गोपाळपूर पर्यंत गेली आहे. पददर्शन रांगेत तसेच पत्राशेड येथे भाविकांसाठी मंदीर समिती व प्रशासन वतीने आवश्यक मुबलक सोयी सुविधा उपलब्ध केल्या असून, या उपलब्ध सोयी सुविधांची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली असून वारी सोहळा सुखकर व्हावा याबाबत पालकमंत्र्यांकडून काटेकोर नियोजन केले जात असल्यामुळे पंढरी नगरीमध्ये येणारा भाविक सुखावत असल्याचे पहावयास मिळत आहे, पददर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये, तसेच पद दर्शन रांगेतील भाविकांचे सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीकडून करण्यात आलेल्या उपायोजनांची माहिती घेतली. तसेच या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध केलेली शौचालये, हिरकणी कक्ष, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधांची पाहणी केली. तसेच पददर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून मंदीर समितीकड...

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यासह देशाच्या विविध भागातून निघालेल्या संतांच्या पालख्या शुक्रवारी वाखरीत दाखल झाल्या,

Image
 प्रतिनिधी, पंढरपूर लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र आषाढी यात्रेकरीता पंढरपूच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण शुक्रवारी बाजीराव विहिरीच्या जवळ रंगले. आनंदाने वारकरी विठू नामाच्या जयघोषात नृत्यमध्ये तल्लीन झाले होते. बाजीराव विहीर परिसरात रिंगणाचा सोहळा वारकर्‍यांनी अनुभवला. रिंगण सोहळ्याचा आनंद महामार्गाच्या उड्डाणपुलावरुन भाविकांना घेता आला. या भव्यदिव्य रिंगण सोहळ्यामुळे शेकडो किलोमीटर अंतर पायी आलेल्या वारकर्‍यांचा शीण गेला, आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी राज्यासह, देशाच्या विविध भागातून निघालेल्या संतांच्या पालख्या शुक्रवारी वाखरीत दाखल झाल्या, तत्पुर्वी, दुपारी 1 वाजता भंडीशेगाव येथून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवला. त्यापूर्वी संत सोपान काका यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघाला. त्यानंतर पिराची कुरोली येथून जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निघाला होता. पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांनी संतांच्या पालख्यांचे दर्शन घेत आपा...

NDPS कायद्याअंतर्गत ४० किलो गांजा बाळगल्या प्रकरणी अटकेतील‌ २ आरोपीस सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर,

Image
प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र  तब्बल ४०  किलो किमतीचा गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा आरोप असलेले  अटकेतील‌ _आरोपी १-अंश गुप्ता (रा.विरार फाटा जि- पालघर)_ व _आरोपी २ - खुशबू जगदीश डोने (रा.विरार जि.ठाणे)_ दोघास _जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.श्री योगेश राणे यांनी सशर्त जामीन अर्ज मंजूर केला आहे, वरील प्रकरणात सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे क्रमांक - २७१/२४ अन्वये एन.डी.पी.एस कायद्याचे कलम ८(क),२०(ब),२(क) तसेच बी. एन.एस. कायद्याचे कलम ३(५) अन्वये वरील दोन्ही आरोपीं विरुद्ध अमली पदार्थ गांजा बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात दोन्ही संशयित आरोपी हे विशाखापटनम येथून एलटीटी एक्सप्रेस या रेल्वेने प्रवास करीत असल्याची गुप्त माहिती सोलापूर येथील लोहमार्ग पोलीस व आर.पी.एफ थाना सोलापूर येथे प्राप्त झाली होती.तसेच त्या संशयित आरोपींना पकडण्यासाठी गुप्त माहिती आधारावर सोलापूर लोहमार्ग पोलीस  व आर.पी.एफ थाना सोलापूर यांनी सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक.५ येथे सापळा रचला होता व पोलिसांनी दोन्ही आरोपींना ...

पत्रकार सुरक्षा समितीच्या पंढरपूर विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी अश्फाक देवळे तांबोळी यांची नियुक्ती,

Image
पंढरपूर, शहर प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र  पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेले आठ वर्षापासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, पत्रकारांसाठी विमा योजना, घरकुल योजना, आरोग्य योजना, यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती, राज्यातील युट्युब व  वेब पोर्टलला शासकीय मान्यता, ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास, पत्रकारांना टोल माफी, खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची प्रकरणे निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी, राज्यातील पत्रकारावर होणारे हल्ले , धमकी, मारहाण, तसेच राज्यातील पत्रकारांच्या इतर प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीच्या पंढरपूर विभाग जिल्हा उपाध्यक्ष पदी रोखठोक न्यूजचे युवा संपादक अशपाक देवळे तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकार अश्फाक देवळे तांबोळी यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे. सन 2018_ 19 मध्ये सांगली कोल्हा...

आषाढीत पंढरपूरमध्ये व्हीआयपी पासला बंदी, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा धाडसी निर्णय

Image
पंढरपूर शहर, प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्युज नेटवर्क, महाराष्ट्र पंढरपूर : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रखुमाईचे ‘व्हीआयपी’ दर्शन पास दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी , उपविभागीय पोलीस अधिकारी यांना याबाबत त्यांनी पत्राद्वारे आदेश दिला आहे. या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्री, आमदार, खासदार, अधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने ‘व्हीआयपी’ पास घेऊन दर्शन घेतात. परिणामी दर्शनरांगेतील भाविकांना मात्र तासन् तास थांबावे लागते. यामध्ये अनेकजण मंत्री किंवा अन्य लोकप्रतिनिधींची शिपारस घेऊनही ‘व्हीआयपी’ म्हणून शरकाव करतात. यामुळे सामान्य भाविकांना मात्र दर्शनासाठी तिष्ठत राहावे लागते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत वरील आदेश काढला आहे, पंढरीत आषाढी यात्रा काळात रोज हजारो भाविक पंढरीत दाखल होत असतात. एकादशीच्या आसपास तर ही संख्या लाखोंच्या घरात जाते. गर्दीमुळे भाविकांना दर्शनासाठी अनेक त...

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत,

Image
  प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र  मुंबई,  उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांनी उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर तत्काळ एनडीआरएफच्या पथकाने धाव घेवून या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. याठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने नद्यांना प्रचंड पूर आला असून दरडी कोसळून वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत. उत्तराखंडमधील यमुनोत्री धामच्या जानकीचट्टी गावात २८ जूनपासून राज्यातील सुमारे १५० पर्यटक अडकून पडले होते. परतीच्या मार्गावर दरड कोसळून रस्ते वाहून गेल्याने त्यांना परत येता येत नव्हते. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून आठ दिवस लागण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात होती. तिथे अडकलेल्या पर्यटकांनी आपल्यापर्यंत मदत पाठवण्याची आणि आपल्याला सुखरूप ठिकाणी हलवण्याची ...

मोठी बातमी: पंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वारकऱ्यांनाही अडवून गळ्याला कोयता, दौंड हादरलं

Image
 प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र पंढरपूरकडे जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार दौंड येथे उघडकीस आला आहे.आषाढी वारी (२०२५) हा संपूर्ण महाराष्ट्राचा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक व आध्यात्मिक उत्सव मानला जातो. या काळात संपूर्ण राज्यात भक्तीमय वातावरण, उत्साह आणि चैतन्याची लहर पाहायला मिळते. वारीच्या निमित्ताने संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी ‘माऊली-माऊली’चा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. आता या वारीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून लुटल्याची घटना समोर आली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूरकडे जाताना वारकरी वाटेत चहासाठी थांबले होते. त्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरून आले. या दोन जणांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला. पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरु यानंतर दोन जणांनी वारकऱ्यांना लुटून नंतर अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेले आणि तिच्य...