NDPS कायद्याअंतर्गत ४० किलो गांजा बाळगल्या प्रकरणी अटकेतील २ आरोपीस सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर,
प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र
तब्बल ४० किलो किमतीचा गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा आरोप असलेले अटकेतील _आरोपी १-अंश गुप्ता (रा.विरार फाटा जि- पालघर)_ व _आरोपी २ - खुशबू जगदीश डोने (रा.विरार जि.ठाणे)_ दोघास _जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.श्री योगेश राणे यांनी सशर्त जामीन अर्ज मंजूर केला आहे,
वरील प्रकरणात सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे क्रमांक - २७१/२४ अन्वये एन.डी.पी.एस कायद्याचे कलम ८(क),२०(ब),२(क) तसेच बी. एन.एस. कायद्याचे कलम ३(५) अन्वये वरील दोन्ही आरोपीं विरुद्ध अमली पदार्थ गांजा बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात दोन्ही संशयित आरोपी हे विशाखापटनम येथून एलटीटी एक्सप्रेस या रेल्वेने प्रवास करीत असल्याची गुप्त माहिती सोलापूर येथील लोहमार्ग पोलीस व आर.पी.एफ थाना सोलापूर येथे प्राप्त झाली होती.तसेच त्या संशयित आरोपींना पकडण्यासाठी गुप्त माहिती आधारावर सोलापूर लोहमार्ग पोलीस व आर.पी.एफ थाना सोलापूर यांनी सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक.५ येथे सापळा रचला होता व पोलिसांनी दोन्ही आरोपींना एलटीटी एक्सप्रेस बोगी क्रमांक -बी १ मधून अटक करून त्यांच्या जवळील अमली पदार्थ घेऊन जाणारे ५ संशयत बॅग ताब्यात घेतले होते.तदनंतर पंचनामा केला असता वरील बॅगेंमधून एकूण जवळपास ४० किलो वजनाचा अमली पदार्थ गांजा आढळून आला.वरील नमूद साहित्य या आरोपीकडे मिळून आले असता त्या मुद्देमालापैकी आंबट उग्र वासाचे गांजा सदृश्य वनस्पतीचे रक्कम ३ लाख ६१ हजार २६६ एवढा मुद्देमाल हस्तगत केला होता. आरोपी हे सदरील गांजा विशाखापटनमहून मुंबई येथे विकण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती सदर आरोपीकडे प्राप्त झाली होती. अटकेनंतर आरोपींनी आपला जामीन अर्ज मे.जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता.वरील प्रकरणात आरोपीं तर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. वैभव बोंगे,ॲड. ओंकार फडतरे यांनी काम पाहिले,
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क
मोहसीन इसाक खान
(८६०५१७१९१७)
( रोहन हनुमंत हिवराळे)
Comments
Post a Comment