पत्रकार सुरक्षा समितीच्या पंढरपूर विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी अश्फाक देवळे तांबोळी यांची नियुक्ती,

पंढरपूर, शहर प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र


 पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेले आठ वर्षापासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, पत्रकारांसाठी विमा योजना, घरकुल योजना, आरोग्य योजना, यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती, राज्यातील युट्युब व  वेब पोर्टलला शासकीय मान्यता, ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास, पत्रकारांना टोल माफी, खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची प्रकरणे निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी, राज्यातील पत्रकारावर होणारे हल्ले , धमकी, मारहाण, तसेच राज्यातील पत्रकारांच्या इतर प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीच्या पंढरपूर विभाग जिल्हा उपाध्यक्ष पदी रोखठोक न्यूजचे युवा संपादक अशपाक देवळे तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पत्रकार अश्फाक देवळे तांबोळी यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे. सन 2018_ 19 मध्ये सांगली कोल्हापूर येथे भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली असता सांगली कोल्हापूर मधील गावामध्ये जाऊन पूरग्रस्तांना स्वखर्चातून चादर वाटप, अन्नदान केले होते. त्याचबरोबर कोरोना महामारीच्या काळामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य करत कुष्ठरोग वसाहत येथे रुग्णांना सतत मदत व उपचाराकरिता आरोग्य सहाय्यक यांना मदत केली होती.  कोरोना महामारीच्या काळामध्ये स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून कुष्ठरोगी वसाहतीमध्ये जाऊन रुग्णांना मदत व उपचार करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, अन्नदान उपक्रम, असे विविध सामाजिक उपक्रम ते सतत राबवत असतात. त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेऊन छावा संघटना सोलापूर जिल्हा यांच्यावतीने त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.  तसेच त्यांनी राबविलेल्या विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने  समाजसेवक ही पदवी देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन व पत्रकारांच्या हिताकरिता त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन पत्रकार सुरक्षा समितीच्या  पंढरपूर विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष, तसेच प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या आदेशाने व कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामभाऊ सरवदे यांच्या अनुमतीने देण्यात आलेली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पत्रकार सुरक्षा समितीच्या संघटन बांधणीस मोठी बळकटी मिळणार आहे. यावेळी बोलताना श्री अश्फाक देवळे तांबोळी म्हणाले की, पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्याकरिता मी सदैव तत्पर आहे . आज पर्यंत पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्याकरिता काम केले आहे. गेल्या सहा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. अनेक पत्रकारांच्या आडी अडचणी मांडण्याचा प्रयत्न मी सतत केलेला आहे. पत्रकारांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता मी सदैव तत्पर आहे. यापुढेही ते काम मी करत राहील. संघटनेने दिलेली जबाबदारी मी योग्य पद्धतीने पार पाडेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.. जिल्ह्यातील पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवण्याकरिता मी सदैव तत्पर असून पत्रकारांच्या हिताकरिता सदैव काम करत राहणार असल्याची ग्वाही यावेळी नूतन जिल्हा उपाध्यक्ष श्री अशपाक देवळे तांबोळी यांनी दिली आहे.. पत्रकार श्री अश्फाक देवळे तांबोळी यांची पंढरपूर विभागाच्या पत्रकार सुरक्षा समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे
 त्यांना पुढील वाटचालीस प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे महाराष्ट्र संघटक गणेश जाधव उपाध्यक्ष किरण बाथम  मराठवाडा विभाग अध्यक्ष बाळासाहेब शिंदे कार्याध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस कार्याध्यक्ष तानाजी माने संघटक मिर्जा गालीब मुजावर सरचिटणीस गणेश कारंडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम वाघमारे परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पोळ धाराशिव जिल्हाध्यक्ष राहुल कोळी  रायगड नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राज भंडारी   नगर जिल्हाध्यक्ष नंदकुमार बगाडे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत,





लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 

                      मोहसीन इसाक खान

                       (८६०५१७१९१७)

                     रोहन हनुमंत हिवराळे.

                       ‌( ८६६८६१००५०)


















Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !