मोठी बातमी: पंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वारकऱ्यांनाही अडवून गळ्याला कोयता, दौंड हादरलं
प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र
पंढरपूरकडे जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार दौंड येथे उघडकीस आला आहे.आषाढी वारी (२०२५) हा संपूर्ण महाराष्ट्राचा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक व आध्यात्मिक उत्सव मानला जातो. या काळात संपूर्ण राज्यात भक्तीमय वातावरण, उत्साह आणि चैतन्याची लहर पाहायला मिळते. वारीच्या निमित्ताने संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी ‘माऊली-माऊली’चा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. आता या वारीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून लुटल्याची घटना समोर आली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूरकडे जाताना वारकरी वाटेत चहासाठी थांबले होते. त्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरून आले. या दोन जणांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला.
पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरु
यानंतर दोन जणांनी वारकऱ्यांना लुटून नंतर अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केले आहेत. या घटनेमुळे दौंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस अज्ञातांचा शोध घेत असून या आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे,
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क
मोहसीन इसाक खान
(८६०५१७१९१७)
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment