सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वारकरी भाविकांशी साधला संवाद करेक्ट नियोजन बद्दल भाविक भक्तांकडून समाधान व्यक्त,
पंढरपूर प्रतिनिधी
आषाढी यात्रा सोहळा दि . ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत असून आषाढी यात्रा सोहळा कालावधीत राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. श्री.विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून, दर्शन रांग गोपाळपूर पर्यंत गेली आहे. पददर्शन रांगेत तसेच पत्रा शेड येथे भाविकांसाठी मंदीर समिती व प्रशासन वतीने आवश्यक मुबलक सोयी सुविधा उपलब्ध केल्या असून, या उपलब्ध सोयी सुविधांची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली असून वारी सोहळा सुखकर व्हावा याबाबत पालकमंत्र्यांकडून काटेकोर नियोजन केले जात असल्यामुळे पंढरी नगरी मध्ये येणारा भाविक सुखावत असल्याचे पहावयास मिळत आहे.
पददर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये, तसेच पद दर्शन रांगेतील भाविकांचे सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीकडून करण्यात आलेल्या उपायोजनांची माहिती घेतली. तसेच या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध केलेली शौचालये, हिरकणी कक्ष, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधांची पाहणी केली. तसेच पददर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून मंदीर समितीकडून पत्रा शेड, दर्शन रांगेत उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री गोरे यांनी दर्शनरांगेतील भाविकांना मोफत अन्नदान सुरु केले असुन या अन्नदानाचे वाटपही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. वारकरी भाविकांसाठी मंदीर समिती व प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची कमतरता भासणार याची घ्यावी अशा सूचनही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर पाहणी करताना वारकरी व भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पालकमंत्री टुव्हीलरवरुन दर्शन रांगेची गोपाळपूर पर्यंत पाहणी केली,
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क
मोहसीन इसाक खान
(८६०५१७१९१७)
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment