पंढरपूर, तालुक्यातील कासेगाव मध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या,
पंढरपूर, प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र
घरगुती वादातून ही आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करत अन्य कारणांचाही शोध घेत असल्याचे पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक मुजावर यांनी सांगितले,पंढरपूर : तालुक्यातील कासेगाव येथील एका दाम्पत्याने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या करण्याची घटना रविवारी रात्री घडली. यातील पत्नीने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतली तर पतीने गळफास घेतल्याचे उघड झाले. सोमवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वत्र एखच खळबळ उडाली आहे. घरगुती वादातून ही आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करत अन्य कारणांचाही शोध घेत असल्याचे पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक मुजावर यांनी सांगितले,कासेगाव येथील म्हामाजी आसबे हे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होते. म्हमाजी यांची पत्नी सोनाली (वय २५ ) यांनी मध्यरात्री शेतातील विहिरीमध्ये सहा वर्षीय मुलगा आणि चार वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारली. तर दुसरीकडे म्हमाजी याने गळफास घेतला. म्हमाजीच्या आत्महत्येच्या प्रकारानंतर ही घटना उघडकीस आली.या बाबत पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घरात पत्नी आणि मुलांचा शोध घेतल्यावर तेही बेपत्ता आढळले. या वेळी लगतच्या विहिरीत शोध घेतल्यावर त्यांचेही मृतदेह आढळून आले,
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क
मोहसीन इसाक खान
(८६०५१७१९१७)
रोहन हनुमंत हिवराळे.
(८६६८६१००५०)
Comments
Post a Comment