पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

 पंढरपूर येथे ४ मार्च  २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कार्यकारी अभियंता विजय पाटील साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता देवकर साहेब, उपकार्यकारी अभियंता अंकोलीकर साहेब, व अतिरिक्त कार्यकारी अभियंता भोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लाईनमन दिवस आज रोजी साजरा करण्यात आला. सदर ठिकाणी सर्व जणमित्र बाह्य स्तोत्र कर्मचारी व अप्रेंटिस यांचा लाईनमन दिवस असल्याकारणाने सन्मान करण्यात आला.


   सन २०२३ पासून "लाईनमन दिवस".   साजरा करण्यास सुरुवात झाली. ऊर्जा क्षेत्रात काम करणारे आपण सर्व......

सूर्य मावळला तरी प्रकाश देण्याचे काम आपण प्रकाशदूत बनून करीत असतो. तक्ते वादळ, ऊन, वारा, पाऊस, महापूर असो की कोरोना सारख्या महामारीतही आपण अहोरात्र काम करून सेवा देत असतो. हे समाजाच्या लक्षात आलं असावं म्हणून लाईनमन दिवस साजरा करण्याचं ठरल असाव असं मला तरी वाटतं....


     सकाळी थकबाकीची यादी घेऊन दारात उभे राहिलो की काही ग्राहकांना आपण यमदूत असल्यासारखे वाटत असतो, पण रात्री एखाद्या घरात पडलेला अंधार दूर करतो तेव्हा त्यांना आपण "प्रकाशदूत" आहोत याची जाणीव होते.

मित्रहो.. आपण जरी ह्या ऊर्जा क्षेत्रात आपापली कुशलता वापरून काम करीत असलो तरी आपल्या हातून विना अपघात सेवा पुरविली जावी त्याकरता सुरक्षिततेविषयी योग्य मार्गदर्शन करून आपल्याला ऊर्जा देणारे आपले वरिष्ठ अधिकारीही असतात त्यांनाही आजच्या दिवशी विसरून चालणार नाही, नाहीतर आपलीच पाठ आपणच थोपटून घेतल्यासारखे होईल. कवी कुसुमाग्रजांनी त्यांच्या कणा ह्या कवितेत म्हटल्याप्रमाणे पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.... त्यातून आपल्याला काम करण्याची ऊर्जा, उत्साह, स्फूर्ती मिळत असते.


      त्यानंतर आपण बघू आपली सुरक्षा..... संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग.... तसं आपण पण विजेशी खेळताना दक्ष असलं पाहिजे.असं म्हणतात की पूजा विधी करतेवेळी मंत्र चुकला तर पुन्हा म्हणता येते पण यंत्र हाताळताना चुकलं तर माफी नाही. या क्षेत्रात आपली पहिली चूक ती शेवटची चूक ठरू शकते ,आणि आपल्या स्वतःच्या चुकीमुळे आपल्या कुटुंबाची कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण होत असते. आपल्यातील एक कुशल कारागीर केल्यामुळे कंपनीचआणि राष्ट्राच सुद्धा खूप मोठ नुकसान होत असतं. आपल्याला वाटत असेल की यात राष्ट्राचं काय नुकसान होतं.... तर आपल्याला शिक्षण, प्रशिक्षण या करिता राष्ट्राच्या विविध संस्थांना मिळणारे अनुदान इत्यादी खर्च शासनाने केलेला असतो. आणि आपल्यासारखा कुशल कारागीर पुन्हा बनवण्याकरिता खर्च करावा लागतो, म्हणून राष्ट्राचे पण खूप मोठे नुकसान होत असतं. 


     म्हणून साठी आपण आज रोजी संकल्प करूया की मी माझे कंपनीचे जनमानसात नावलौकिक करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन.



@लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क पंढरपूर,

जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 

मोहसीन इसाक खान (८६०५१७१९१७)

रोहन हनुमंत हिवराळे (८६६८६१००५०)

कार्यालय =हनुमान नगर लक्ष्मी टाकळी रोड पंढरपूर रेल्वे बोगद्याजवळ.


Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !