अवैधरित्या दारू विक्रीवर पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई
पंढरपूर, तालुका प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्युज नेटवर्क, महाराष्ट्र
आषाढी यात्रा सोहळ्याच्या निमित्ताने पंढरी नगरीमध्ये प्रशासनाच्या वतीने रयत तयारी करण्यात येत असून पोलीस प्रशासनाच्या वतीने अवैध धंद्यांवर करडी नजर ठेवली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून तालुका पोलीस ठाण्याने मोठी कारवाई केली आहे,
पंढरपूर ते कुर्डूवाडी रोडवर हॉटेल शुभेच्छा पाठीमागे असलेले पत्राशेड खोलीमध्ये मौजे भटुंबरे येथे या गावाचे शिवारातील सतीश रामा वसेकर वय 41 वर्ष रा. नारायण चिंचोली तालुका पंढरपूर याचे वस्तीतील घरामध्ये अवैधरित्या दारू विक्रीसाठी देशी विदेशी दारूचा साठा असल्या बाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्या नंतर पोलिसांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली छापा मारून एकूण 1,50,672/- रुपये किमतीचा मुद्देमाल मौजे भटुंबरे गावचे शिवारामध्ये मॅकडोनाल्ड व इतर कंपनीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या एकूण 30 बॉक्स देशी-विदेशी दारू त्याची किंमत एकूण रुपये 1,50,672/- रुपये किमतीचा दारूच साठा अवैध विक्री करण्यासाठी बाळगलेल्या अवस्थेत मिळून आल्याने सर्व दारूचा साठा पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून इसमनामेसतीश रामा वसेकर वय 41 वर्ष रा. नारायण चिंचोली तालुका पंढरपूर याचे विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, पीएसआय भारत भोसले, सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले, पोलीस हे. कॉ, मंगेश रोकडे, गजानन माळी, सुधीर शिंदे,सुहास देशमुख, पोलीस कॉ. सागर गवळी, महिला पोलीस हवालदार मनेरी मॅडम पोलीस कॉ. महेश गोडसे, पोलीस होमगार्ड सुनील कवडे यांच्या पथकाने केली आहे,
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क
मोहसीन इसाक खान
(८६०५१७१९१७)
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment