पंढरपूर: तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार
प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने मराठी राज्य पत्रकार दिनानिमित्त पंढरपूर येथील पत्रकार बंधूंचा वरीष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून फार मोठे जबाबदारीचे काम असते,
पंढरपूर येथील सर्व पत्रकार समोर असेल तीच वस्तुस्थिती मांडतात, चुकीचे असेल तर झोडपून काढतात, पूर परिस्थिती निर्माण झाली तेव्हा पत्रकारांनी उत्तम वार्तांकन केले तसेच यात्रा काळात नेहमीच पत्रकार बांधवांचे सहकार्य असते,
यावेळी पोलीस उप निरीक्षक शहाजी भोसले, वडणे , सौ रेळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे, उपाध्यक्ष चैतन्य उत्पात, सुनील अधटराव, श्रीकांत कसबे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे शहराध्यक्ष रफीक आतार, दैनिक तरुण भारत संवाद चे प्रतिनिधी संतोष रणदिवे, चैतन्य उत्पात, पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष लखन साळुंखे, मराठी राज्य पत्रकार समितीचे उपाध्यक्ष रामकृष्ण बिडकर, दत्ता पाटील, श्रीकांत कसबे, रामभाऊ सरवदे, मिलिंद यादव, भगवान वानखेडे, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क पोर्टल महाराष्ट्र मुख्य संपादक एजाज शेख , प्रमोद बाबर,नेताजी वाघमारे, बजरंग नागणे , विनोद पोतदार आदी पत्रकार बंधूंचा दैनंदिनी, पेन, गुलाबपुष्प, श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
Comments
Post a Comment